शहरं
Join us  
Trending Stories
1
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
2
Top Marathi News LIVE Updates: मस्साजोगच्या पोटनिवडणुकीत धक्कादायक निकाल; अश्विनी देशमुख पराभूत
3
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
4
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
5
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
6
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
7
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
8
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
9
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
10
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
11
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
12
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
13
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
14
उन्हामुळे शरीराचे ‘हे’ तीन अवयव होऊ शकतात निकामी; डॉक्टरांनी दिले ६ खास सल्ले, जाणून घ्या
15
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
16
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
17
पाणी येताच दारी, ‘लक्ष्मी’ आली घरी! दुर्गम सातपुड्यातील नागझरीमधील हाऱ्यापाड्यावरची अनोखी ‘जलकहाणी’
18
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
19
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
20
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शेषराव पाटील जिनिंगची आमसभा वादळी

By admin | Updated: September 29, 2016 01:23 IST

येथील शेषराव पाटील जिनिंग व प्रेसिंगची बुधवारी झालेली वार्षिक आमसभा वादळी ठरली.

अध्यक्षांना घेराव : भूखंड लाटण्याचा डाव हाणून पाडलापुसद : येथील शेषराव पाटील जिनिंग व प्रेसिंगची बुधवारी झालेली वार्षिक आमसभा वादळी ठरली. या बैठकीत सभासदांनी अध्यक्षांना घेराव घातला, तर संस्थेचे सदस्य मांगिलाल चव्हाण यांनी जिनिंगच्या भूखंडाची विक्री करताना माजी बोली १०० कोटीपासून सुरू होईल, अशी घोषणा केली. यामुळे सत्ताधाऱ्यांचा भूखंड लाटण्याचा डाव एक प्रकारे हाणून पाडला. पुसद येथील शेषराव पाटील जिनिंगच्या आमसभेत येथील कारला मार्गावरील जिनिंग फॅक्टरी क्र.१ ची जमीन व मशनरी विकण्याची परवानगी पणन संचालकांकडून घेतली आहे. संस्थेने चार हेक्टर पाच आर एवढा भूखंड १५ कोटी ३५ लाख २५ हजार रुपयांचे मूल्यांकन दुय्यम निबंधकांनी केले आहे. या मूल्यांकनावर आक्षेप घेतल्यानंतर सदर भूखंडाचे मूल्यांकन १५ वरून २२ कोटी ५१ लाख रुपये झाले. यावरही आक्षेप घेतला. फेरमूल्यांकन करण्यात आले. त्यात २९ कोटी १६ लाख रुपये बाजारमूल्य निर्धारित केले. यावरही सभासदांचे समाधान झाले नाही. त्यांनी पणन महासंचालकांकडे तक्रार नोंदविली. त्यानंतर संस्थेने शासकीय नोंदणीकृत ठेकेदार अधिकृत मूल्यांकन करून घेतले. त्यात २९ वरून ३२ कोटी ४० लाख रुपये बाजारमूल्य निर्धारित करण्यात आले. १६ कोटींची मालमत्ता ३२ कोटींवर नेण्याचे श्रेय जागरूक सभासदांना जाते.यासंदर्भात २७ सप्टेंबर रोजी ‘लोकमत’मध्ये ‘सव्वाशे कोटीचे भूखंड केवळ १६ कोटीला’ या शीर्षकाखाली वृत्त प्रकाशित झाले होते. या वृत्तात तीन वर्षांपूर्वी नाईक चौकातील नगरपरिषदेचा पाच हजार चौरस फूट भूखंड या दराने विकण्यात आला होता. जिनिंगचा भूखंड हा बसस्थानकाजवळ मुख्य मार्गाला लागून आहे. या भूखंडाचा आताचा बाजारभाव पाच हजार रुपयांपेक्षा अधिक आहे. तेव्हा चार हजार हेक्टर पाच आर एवढा भूखंड बाजारमूल्याप्रमाणे २०० कोटी रुपयांपेक्षा अधिक होतो. ही बाब ‘लोकमत’ने उघड केली होती.त्यानुसार बुधवारी झालेल्या जिनिंगच्या सभेत माजी जिल्हा परिषद सदस्य मांगिलाल चव्हाण यांनी भूखंडाची विक्री करताना आपली पहिली बोली १०० कोटींपासून राहील, असे सांगितल्याने संचालकांना हादरा बसला. त्यानंतर अनेक सभासद बोलण्यासाठी उठले असता, त्यांना बोलू दिले नाही. अखेरीस सभासदांनी अध्यक्ष विजय चव्हाण यांना घेराव घातला. तब्बल एक तास सभेचे कामकाज चालले. नवीन सभासद नोंदणी करा, भूखंड विक्रीची नोटीस सर्व सभासदांना देण्यात यावी, अशी मागणी संजय लोंडे यांनी केली. संस्थेचे माजी सभासद ज्ञानेश्वर तडसे यांना बोलूच दिले नाही. सभासदांनी सभेत गोंधळ घातला. त्यामुळे सभा तहकूब झाली. (तालुका प्रतिनिधी)