राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी बाळासाहेब कामारकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 20:23 IST2021-05-06T20:22:41+5:302021-05-06T20:23:06+5:30

Yawatmal news राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष क्रांती उर्फ बाळासाहेब कामारकर यांची  गुरुवारी नियुक्ती करण्यात आली आहे. 

Balasaheb Kamarkar as the Yavatmal District President of NCP | राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी बाळासाहेब कामारकर 

राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी बाळासाहेब कामारकर 

लोकमत न्यूज नेटवर्क 

यवतमाळ : राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष क्रांती उर्फ बाळासाहेब कामारकर यांची  गुरुवारी नियुक्ती करण्यात आली आहे. 
तत्कालीन जिल्हाध्यक्ष ख्वाजा बेग यांनी फेब्रुवारीमध्ये जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या जिल्हा दौऱ्यानंतर बेग यांनी पक्षांतर्गत धुसफुसीतून राजीनामा दिल्याचे सांगितले जात होते.  त्या पाठोपाठ राष्ट्रवादीच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष क्रांती धोटे यांनीही राजीनामा दिला होता. तीन महिन्यांपासून रिक्त असलेल्या राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदावर अखेर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बाळासाहेब कामारकर यांची नियुक्ती केली. 

तीनही जिल्हाध्यक्ष पुसद विभागात 
काॅंग्रेस, भाजप व आता राष्ट्रवादी या तीनही पक्षाचे जिल्हाध्यक्ष पद पुसद- उमरखेड विभागात गेले आहे.

Web Title: Balasaheb Kamarkar as the Yavatmal District President of NCP