ओरिसा येथून आले बॅग लिफ्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 06:00 IST2019-12-02T06:00:00+5:302019-12-02T06:00:07+5:30

डिजय जेलगा प्रधान (२४) रा. दशमागिया जि. जाजपूर ओरिसा, आर रविकुमार मोहन (४६) रा. नारायणपूर जि. गंजाम ओरिसा असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. विदर्भातील यवतमाळ, अमरावती, वर्धा जिल्ह्यांमध्ये बॅग लिफ्टींगचे गुन्हे करणे हाच यांचा मुख्य रोजगार आहे. ओरिसातून रेल्वेने दुचाकी घेऊन नागपुरात दाखल झाले.

The bag lifter came from Orissa | ओरिसा येथून आले बॅग लिफ्टर

ओरिसा येथून आले बॅग लिफ्टर

ठळक मुद्देदुचाकीही आणली : यवतमाळ, अमरावती, वर्धेत केले गुन्हे

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : बँकेच्या समोर पाळत ठेऊन पाठलाग करायचा, नंतर संधी मिळताच त्याची बॅग हिसकावून पोबारा करायचा ही गुन्ह्याची पद्धत. थेट ओरिसातून नागपूरमार्गे यवतमाळ जिल्हा गाठला. विदर्भातील अमरावती, वर्धा या जिल्ह्यातही बॅग लिफ्टींगचे गुन्हे केल्याची कबुली या आरोपींनी दिली. मारेगाव पोलिसांच्या सतर्कतेनंतर वडकी पोलिसांनी या बॅग लिफ्टरला सिनेस्टाईल पकडले. आता त्यांच्याकडून धक्कादायक माहिती पुढे येत आहे.
डिजय जेलगा प्रधान (२४) रा. दशमागिया जि. जाजपूर ओरिसा, आर रविकुमार मोहन (४६) रा. नारायणपूर जि. गंजाम ओरिसा असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. विदर्भातील यवतमाळ, अमरावती, वर्धा जिल्ह्यांमध्ये बॅग लिफ्टींगचे गुन्हे करणे हाच यांचा मुख्य रोजगार आहे. ओरिसातून रेल्वेने दुचाकी घेऊन नागपुरात दाखल झाले. ३० आॅक्टोबर रोजी नागपूर रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी यवतमाळातील सहकारनगरमध्ये १ नोव्हेंबरला सुधा काठोके या महिलेची रोख रक्कम असलेली बॅग हिसकावून नेली. हे दोन्ही आरोपी बँकेच्या परिसरात पाळत ठेऊन असतात. महिला किंवा वृद्ध पैसे घेण्यासाठी आला व बाहेर पडताच त्याचा पाठलाग सुरू करतात. सुधा काठोके या महिलेची बॅग याच पद्धतीने लंपास केली. हे आरोपी सीसीटीव्ही कॅमेरातही कैद झाले. मात्र राज्याबाहेरचे आरोपी असल्याने पोलीस रेकॉर्डवर त्याची कुठलीही नोंद नाही. याचाच फायदा हे आरोपी घेत होते. त्यांंनी अमरावती शहरात, वर्धा जिल्ह्यातील सेलू येथे गुन्हे केले आहेत. यवतमाळ शहरातील अवधूतवाडी व शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बॅग लिफ्टींगचे गुन्हे केले. मारेगाव येथे शेतकºयाची ५० हजार रुपयांची रोख असलेली बॅग या चोरट्यांनी लंपास केली. वडकी पोलिसांंनी आष्टोना फाट्याजवळ चोरट्यांना सिनेस्टाईल पाठलाग करीत पकडले.

Web Title: The bag lifter came from Orissa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Thiefचोर