भीषण आगीत सात लाखांचे साहित्य खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 05:00 IST2020-01-07T05:00:00+5:302020-01-07T05:00:37+5:30
घोन्सा येथील मुख्य मार्गावर अनिल साळवे यांचे ऑटोमोबाईल आहे. रविवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे दुकानाला अचानक आग लागली. ही बाब शेजारी असलेल्या दौलत बरतीने यांच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी अनिल साळवे यांना घटनेची माहिती दिली. दरम्यान, गावकऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पाण्याचा मारा केला. मात्र तोपर्यंत दुकानातील सर्व साहित्य जाळून खाक झाले. याबाबत वणी येथील अग्निशमन दलाला माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र संबंधितानी दूरध्वनीवर प्रतिसाद दिला नाही.

भीषण आगीत सात लाखांचे साहित्य खाक
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : तालुक्यातील घोन्सा येथील उपसरपंच अनिल साळवे यांच्या ऑटोमोबाईल दुकानासह लगतचा फोटो स्टुडिओ व एका घराला रविवारी रात्री अचानक लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले. रुपयांचे नुकसान झाले.
घोन्सा येथील मुख्य मार्गावर अनिल साळवे यांचे ऑटोमोबाईल आहे. रविवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे दुकानाला अचानक आग लागली. ही बाब शेजारी असलेल्या दौलत बरतीने यांच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी अनिल साळवे यांना घटनेची माहिती दिली. दरम्यान, गावकऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पाण्याचा मारा केला. मात्र तोपर्यंत दुकानातील सर्व साहित्य जाळून खाक झाले. याबाबत वणी येथील अग्निशमन दलाला माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र संबंधितानी दूरध्वनीवर प्रतिसाद दिला नाही. शटर उघडताना अनिल साळवे यांच्या हाताला दुखापत झाली. या आगीत सात लाख २० हजार रुपयांची हानी झाली. याबाबत अनिल साळवे यांनी सोमवारी सकाळी मुकुटबन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असून आगीला वीज वितरण कंपनी जबाबदार असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी साळवे यांनी केली आहे. या आगीची झळ लगतच्या जयंत ताजने यांच्या फोटो स्टुडिओला लागली. यात त्यांचे ३५ हजार रुपयांचे नुकसान झाले. बाजुलाच दौलत बरतीने यांच्या घरालाही झळ पोहचली. मात्र युवकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केल्याने जीवितहानी टळली.