शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

जात प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ

By admin | Updated: September 21, 2014 23:58 IST

माना समाजाचे जात प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ होत असल्याची तक्रार तालुक्यातील कोसारा येथील पांडुरंग नन्नावरे व नामदेव चौधरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे़

मारेगाव : माना समाजाचे जात प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ होत असल्याची तक्रार तालुक्यातील कोसारा येथील पांडुरंग नन्नावरे व नामदेव चौधरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे़तालुक्यातील कोसारा येथील पांडुरंग नन्नावरे व नामदेव चौधरी हे ‘माना’ या जातीचे आहेत़ यापूर्वीच माना जातीला घटनेच्या अनुसूचित जाती, जमाती सुधारणा अधिनियम कायदा १९७६ नुसार अनुसूचित जमातीचा दर्जा प्राप्त झाला आहे़ त्या अनुषंगाने उपविभागीय अधिकाऱ्यांनी ३१ डिसेंबर २०११ पर्यंत माना जमातीचे जातीचे प्रमाणपत्र निर्गमित केले आहे़ तक्रारकर्त्यांच्या मुलानेही जात प्रमाणपत्रासाठी तहसीलदारांकडे प्रकरण सादर केले. मात्र दीड वर्षांचा कालावधी लोटूनही त्यांना जातीचे प्रमाणपत्र मिळाले नाही़ त्यामुळे मुलाचे शैक्षणिक नुकसान होत असून त्याचे भविष्य धुळीस मिळाले आहे़ स्रेहल नन्नावरे व शीतल नन्नावरे यांच्या नावांचे केंद्रीय प्रपत्रामध्ये जातीचे प्रमाणपत्र मिळण्याकरिता तहसीलदारांमार्फत उपविभागीय अधिकाऱ्यांकडे प्रकरण दाखल झाले आहे. या चारही प्रकरणातील जातीचे प्रमाणपत्रे मागील तीन ते पाच महिन्यांपासून उपविभागीय अधिकारी कार्यालयात पडून आहे़ त्यावर अद्याप कोणतीही कारवाई झाली नसून कोणताही निर्णय देण्यात आला नाही़ याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवावे व त्वरित जातीचे प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी पांडुरंग नन्नावरे व नामदेव चौधरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे. (तालुका प्रतिनिधी)