शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्ती वेतन बँकेत पाठविण्यास टाळाटाळ

By admin | Updated: May 23, 2015 00:04 IST

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे पंचायत समितीस्तरावर कार्यरत कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसल्याचे ...

पंचायत समितीकडून ‘आर्थिक’ अडवणूक : निवृत्त ग्रामविकास अधिकाऱ्याची फरफट यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे पंचायत समितीस्तरावर कार्यरत कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसल्याचे अनेक बाबींवरून स्पष्ट झाले आहे. बाभूळगाव पंचायत समिती अंतर्गत सेवानिवृत्त विस्तार अधिकाऱ्याची निवृत्ती वेतनासाठी होत असलेली फरफट हा या बाबीचा एक नमुना आहे. लिपीक, लेखापाल आणि गटविकास अधिकाऱ्यांकडून त्यांची जाणीवपूर्वक अडवणूक केली जात आहे. ही बाब त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे कळविली आहे. बाभूळगाव पंचायत समितीतून सेवानिवृत्त झालेले माणिक विठोबाजी मातकर (६८) यांची ही समस्या आहे. त्यांनी नोव्हेंबर २०१४ चे आत हयात असल्याचा फॉर्म भरून दिला नाही. प्रकृती अस्वास्थामुळे ही प्रक्रिया राहून गेली. त्यामुळे त्यांना डिसेंबर पेड इन २०१४ चे निवृत्ती वेतन जानेवारी २०१५ मध्ये मिळाले नाही. परंतु २५ जानेवारी २०१५ च्या आत हयात असल्याचा अर्ज बाभूळगाव पंचायत समितीचे वरिष्ठ लिपिक जवंजाळ यांच्याकडे भरून दिला. त्यांनी लेखापाल गड्डमवार यांची भेट घेण्याचा सल्ला दिला. यावर गड्डमवार यांनी अलाटमेंटच आले नसल्याचे सांगून निवृत्ती वेतन निघाले नसल्याची माहिती दिली. ही बाब तत्कालीन गटविकास अधिकारी दोडके यांच्याकडे मांडली. त्यांनी मार्च महिन्यात मागील तीनही महिन्याचे निवृत्ती वेतन देण्याचे आश्वासन दिले. बँकेत मात्र मार्च महिन्याचेच वेतन जमा झाले होते. केवळ आर्थिक अपेक्षा पूर्ण न केल्याने पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांकडून आपली अडवणूक केली जात असल्याचा आरोप मातकर यांनी केला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे ही बाब यापूर्वी त्यांनी मांडली. त्यांच्याकडूनही न्याय न मिळाल्याने मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले. शिवाय विविध विभागाचे अधिकारी आणि मंत्र्यांकडे निवेदन पाठविले आहे. सदर अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी आणि अडकवून ठेवलेले दोन महिन्यांचे निवृत्ती वेतन द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. (वार्ताहर)मागितली आत्महत्येची परवानगीवरिष्ठ लिपिक जवंजाळ, लेखापाल गड्डमवार, गटविकास अधिकारी दोडके यांनी आपला मानसिक, शारीरिक छळ केलेला आहे. दमा, श्वासोच्छवासाचा आजार असतानाही आपल्याला वारंवार कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहे. चार महिन्यांचा कालावधी लोटूनही दोन महिन्यांचे सेवानिवृत्ती वेतन बँकेत पाठविले नाही. या प्रकारची चौकशी करावी, न्याय मिळत नसल्यास आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी, असे मातकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.