वेकोलिकडून अनुकंपाखाली नोकरी देण्यास टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:34 IST2021-07-25T04:34:51+5:302021-07-25T04:34:51+5:30

वेकोलिच्या सर्विस रेकॉर्डमध्ये वेकोलि कार्मचाऱ्यांच्या अधिकृत वारसदाराची नोंद असते. त्यात एकाला नोकरी देण्याकरिता बाकी वारसदारांचे संमतीपत्र ...

Avoid giving jobs out of sympathy from Vecoli | वेकोलिकडून अनुकंपाखाली नोकरी देण्यास टाळाटाळ

वेकोलिकडून अनुकंपाखाली नोकरी देण्यास टाळाटाळ

वेकोलिच्या सर्विस रेकॉर्डमध्ये वेकोलि कार्मचाऱ्यांच्या अधिकृत वारसदाराची नोंद असते. त्यात एकाला नोकरी देण्याकरिता बाकी वारसदारांचे संमतीपत्र जोडणे आवश्यक असते. मात्र वेकोलि प्रशासन त्यांना याव्यतिरिक्त अनावश्यक कागदपत्रांची मागणी करून त्यांची फाईल रेंगाळत ठेवतात, असा आरोप आहे. आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, पासपोर्ट असतानाही वेकोलि प्रशासन राजपत्रित अधिकाऱ्याकडून ओळखपत्र बनवून आणण्यास सांगतात. वणी तालुक्यातील बहुतांश गावातील शेतजमिनी वेकोलिने संपादित केल्या आहे. संपादित केलेल्या भूधारकांना वेकोलिमध्ये नोकरी दिली जाते. मात्र अनेक वर्षांपासून शेती वेकोलिने संपादित केली असतानाही अजूनही शेतकऱ्याच्या मुलाला नोकरी मिळाली नाही. वेकोलि प्रशासन सामायिक हिस्सेदार असलेल्या सातबारामध्ये त्यांच्यात आपसात वाद लावून नोकरीचे प्रकरणे रेंगाळत ठेवतात. नोकरीच दिली नाही तर आमची शेतजमीन संपादित कशाला केली, असा सवालही शेतकरी करीत आहे. त्यामुळे वेकोलिने या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन अनुकंपाखाली असलेल्यांना नोकरी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Avoid giving jobs out of sympathy from Vecoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.