आर्णी येथे घोडे व्यावसायिक व समर्थकांचा घरावर हल्ला

By Admin | Updated: August 2, 2015 02:26 IST2015-08-02T02:26:12+5:302015-08-02T02:26:12+5:30

महिलेची तक्रार : ‘त्या’ घटनेची पाहणी करण्यासाठी पोलीस अधीक्षकांची भेट, समेटाच्या वेळी झाला चाकुहल्ला

An attack on a horse and a supporters house in Arni | आर्णी येथे घोडे व्यावसायिक व समर्थकांचा घरावर हल्ला

आर्णी येथे घोडे व्यावसायिक व समर्थकांचा घरावर हल्ला

आर्णी : घोडे व्यावसायिकाला अडविल्याच्या कारणावरून आर्णी येथे शुक्रवारी निर्माण झालेल्या वादाचे पर्यावसान रात्री एका घरावर हल्ला करण्यात झाले. घराची नासधूस केल्याची तक्रार महिलेने दिली आहे. दरम्यान, शनिवारी
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी
आर्णीला भेट देवून घटनेची माहिती घेतली.
आर्णी येथे घोडे व्यावसायिकाचे वाहन अडविण्याच्या कारणावरून सचिन आत्राम व त्याच्या तीन साथीदारांनी वाद घातला. त्यानंतर घोडे व्यावसायिकाच्या मुलांनी सचिन आत्रामच्या घरी जावून याबाबत जाब विचारला. त्यानंतर समेट घडविण्यासाठी शुक्रवारी दुपारी ही मंडळी शिवनेरी चौकात एकत्र आली. त्यावेळी सचिनने चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे. त्यानंतर रात्री ८ वाजता सचिन आत्रामच्या घरी आई एकटी असताना दहा ते बारा जणांनी घरी येवून धुडगूस घातला. याप्रकरणी यशोदा आत्राम हिने दिलेल्या तक्रारीवरून अशफाक शेख, दानिश शेख, जाकीर सोलंकी, जावेद, इब्रान चव्हाण, फैयाज शेख, सुदाम गॅरेजवाला, शेख शफीक घोडेवाला, युनुस ड्रायव्हर, खलील शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार होत नाही तोच रात्री १.३० वाजताच्या सुमारास दोन दुचाकीवरून आलेल्या सहा जणांनी सचिन आत्रामच्या घरी धुडगूस घालून घराची नासधूस केली. याप्रकरणाची तक्रार पुन्हा पोलिसात देण्यात आली. या प्रकारामुळे आर्णी शहरात एकच खळबळ उडाली.
दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी शनिवारी आर्णी शहराला भेट देवून घटनास्थळाची पाहणी केली. या प्रकरणात गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्यात येईल, सचिनच्या घरावर हल्ला करणाऱ्यांचा शोध घेवू, नागरिकांनी शांतता ठेवण्याचे आवाहन केले. विशेष म्हणजे, घोडे व्यावसायिकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे, तर दोन जण अद्याप फरार आहे. यशोदाबाई आत्रामच्या तक्रारीवरून दहा पैकी एकाही आरोपीला अटक केली नाही. पोलिसांनी धरपकड मोहीम सुरू केली आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: An attack on a horse and a supporters house in Arni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.