शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकांमध्ये आता नव्यांना संधी द्या; अशोक चव्हाणांनी टोचले काँग्रेस नेत्यांचे कान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 10:46 IST

जुन्या चेहन्यांचा विट आला आहे, हे चेहरे नकोसे झाले आहेत, येत्या काळात पक्षाने यात बदल न केल्यास पक्षाची स्थिती सुधारेल असे वाटत नाही

यवतमाळ : निवडणुकांमध्ये सातत्याने पराभवाचा सामना करूनही पुन्हा नव्याने उमेदवारीसाठी धडपड करणाऱ्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचे माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी चांगलेच कान टोचले. जनतेला जुन्या चेहऱ्यांचा विट आला असून ज्येष्ठांनी आता थांबले पाहिजे, त्याऐवजी तरुण नव्या चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे, अशी भूमिका चव्हाण यांनी मांडली. त्यावर उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात जोरदार दाद दिली.

विदर्भातील काँग्रेसच्या मंत्र्यांचा सत्कार आणि पश्चिम विदर्भीय कार्यकर्ता मेळावा शनिवारी येथे पार पडला. यात मंत्र्यांनी जोशपूर्ण भाषणे करून कार्यकत्यांना आम्ही तुमच्या सोबत आहोत याचा विश्वास देण्याचा प्रयत्न केला. भाषणांमधून कुणी व्यथा मांडला तर कुणी पक्षाला नवी दिशा दिली. तर अशोक चव्हाण यांनी आपल्या भाषणात काँग्रेसच्या तमाम नेत्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे विचार मांडले.

चव्हाण म्हणाले की, एकेकाळी यवतमाळ व नांदेड या जिल्ह्यांमध्ये केवळ काँग्रेसच निवडून येत होती, आमच्या नांदेड जिल्ह्यातील ही पत राखली, मात्र यवतमाळला गेल्या काही निवडणुकांमध्ये ही पत राखता न आल्याने काँग्रेसचा हा बालेकिल्ला नेस्तनाबूत झाला. यामागील कारणे शोधले असता तेच ते चेहरे आणि प्रत्येक निवडणुकीत एकाच चेहऱ्याला तिकीट ही बाब प्रकर्षाने पुढे आल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

तर लोकांना या जुन्या चेहऱ्यांचा विट आला आहे, हे चेहरे नकोसे झाले आहेत, येत्या काळात पक्षाने यात बदल न केल्यास पक्षाची स्थिती सुधारेल असे वाटत नाही, ज्येष्ठ नेत्यांनीही काहीशी उसंत घेऊन आता थांबले पाहिजे, नव्या चेहऱ्यांना पक्षाने संधी दिली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. अशोकराव चव्हाण यांच्या या वक्तव्याचे सभागृहातील उपस्थितांनी टाळ्या वाजवून जोरदार स्वागत केले.अशोक चव्हाण यांचे हे वक्तव्य यवतमाळ जिल्ह्यात तंतोतंत खरे ठरत असल्याची प्रतिक्रिया उपस्थित काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये ऐकायला मिळाली. यावेळी व्यासपीठावर उपस्थित जिल्ह्यातील नेत्यांपैकी कोण किती वेळा कोणती निवडणूक हारले याचा हिशोब आपसातील चर्चेत मांडणे सुरु झाले होते.