२७ लाख नागरिकांच्या दारावर ‘आशा’ देणार दस्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 05:00 AM2020-04-01T05:00:00+5:302020-04-01T05:00:19+5:30

कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती आणि त्याच्या संपर्कात असलेल्या घनिष्ट व्यक्तींना बाधा होण्याची दाट शक्यता असते. नागरिक आपल्याला इतर लोक वाळीत टाकतील म्हणून खरी माहिती सांगत नाही. ही माहिती प्रशासनाला मिळावी म्हणून दररोज सर्व्हेक्षण करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. त्याची अंमलबजावणी आरोग्य विभागाने सुरू केली आहे.

'Asha' knock on the door of 27 lakh citizens | २७ लाख नागरिकांच्या दारावर ‘आशा’ देणार दस्तक

२७ लाख नागरिकांच्या दारावर ‘आशा’ देणार दस्तक

Next
ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभर सर्वेक्षण : आरोग्य विभागाची सावधगिरी, घरोघरी जाऊन मिळविणार माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोव्हीड-१९ रोखण्यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. जिल्ह्यातील २७ लाख नागरिकांचे दररोज ‘डोअर टू डोअर’ सर्व्हेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. मंगळवारपासून या सर्व्हेक्षणाला गावपातळीेवर सुरूवात झाली आहे. कोरोनाचे उच्चाटन होईपर्यंत दररोज सर्व्हेक्षण करण्याचे आदेश आरोग्य विभागाला देण्यात आले आहे.
कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती आणि त्याच्या संपर्कात असलेल्या घनिष्ट व्यक्तींना बाधा होण्याची दाट शक्यता असते. नागरिक आपल्याला इतर लोक वाळीत टाकतील म्हणून खरी माहिती सांगत नाही. ही माहिती प्रशासनाला मिळावी म्हणून दररोज सर्व्हेक्षण करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. त्याची अंमलबजावणी आरोग्य विभागाने सुरू केली आहे.
छोट्या गावामध्ये अंगणवाडी सेविका आणि आशा यांच्या मदतीने हा सर्व्हे केला जात आहे. तर मोठ्या गावामध्ये आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविका मदतीला आहे. हा सर्व्हे पूर्ण करताना सर्दी, खोकला आणि ताप याची स्वतंत्र कॅटेगरी करण्याचे आदेश आहेत. तर कोरडा खोकला, ताप, श्वास घेण्यास त्रास होणाऱ्या व्यक्तीचा स्वतंत्र वर्ग तयार करण्यात आला. या व्यक्तींना श्वास घेण्यास त्रास होत असेल तर तत्काळ तालुक्याला ‘रेफर’ करण्याच्या सूचना आहेत.
हे सर्व्हेक्षण पार पाडणाºया वक्तीची आरोग्य विभाग विशेष काळजी घेणार आहे. त्यांना मास्क, सॅनेटायझर पुरविले जाणार आहे. गोळा झालेली माहिती दररोज अपडेट करून ऑनलाईन पाठविण्याच्या सूचना आहे. यामुळे गावात कुठला नवीन रूग्ण आढळल्यास तत्काळ माहिती मिळणार आहे.

मजुरांसाठी उघडले जाणार अन्नछत्र
मजुरांच्या मदतीसाठी अन्नछत्र उघडले जाणार आहे. त्याकरिता कम्यनिटीबेस किचन गावपातळीवर उभारले जाणार आहे. स्लम भागातही याची अंमलबजावणी होणार आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या आहे. स्वयंसेवी संस्थांची यासाठी मदत घेतली जाणार आहे. ज्या भागात ही मदत मिळणार नाही, अशा ठिकाणी कम्युनिटीबेस किचन उघडले जाणार आहे. एकाच ठिकाणी अशा व्यक्तींच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. शहरातील गर्दी रोखण्यासाठी एकाच वाहनातून सर्वत्र अन्न वितरणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व स्वयंसेवकांना एकत्र बोलविण्यात आले आहे. यामुळे शहरातील वर्दळ कमी होणार आहे. त्या दृष्टीने प्रशासनाने पावले उचलली आहे. समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची यासाठी चमू तयार करण्यात आली आहे. यासोबतच विविध स्वयंसेवी संघटनांना मदतीसाठी बोलविण्यात आले. त्यांचा पत्ता आणि विविध विषयाची माहिती नोंदविण्यात आली.
‘त्या’ विद्यार्थ्यांना शिधा
परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सध्या यवतमाळबाहेर जाण्यास बंदी आहे. अशा विद्यार्थ्यांना लॉकडाऊनच्या काळात अन्नधान्य घरपोच दिले जाणार आहे. त्याकरिता प्रशासनाकडे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना आपली नोंद करावी लागणार आहे.

Web Title: 'Asha' knock on the door of 27 lakh citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.