शहरं
Join us  
Trending Stories
1
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
2
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
3
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
4
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
5
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
6
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
7
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
8
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
9
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
10
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
11
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
12
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
13
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
14
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
15
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
16
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
17
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
18
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
19
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
20
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
Daily Top 2Weekly Top 5

जीवनदायी योजनेतून आर्थोस्कोपी शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 06:00 IST

आर्णी तालुक्यातील गणगाव साकूर येथील युवक स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होता. मित्रासोबत बाहेर जात असताना दुचाकी स्लीप होऊन अपघात झाला. कुठेही मार लागला नाही, मात्र काही दिवसानंतर डाव्या पायाचा टोंगळा काम करणेच बंद झाला. पायावर उभेही राहता येत नव्हते. मोलमजुरी करणाऱ्या कुणाल रामटेके याच्या कुटुंबातील आर्थिक परिस्थिती बेताची होती.

ठळक मुद्देगुडघ्याच्या लिगामेंटवर उपचार : किरकोळ अपघाताने गुडघा झाला होता निकामी

सुरेंद्र राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : धावपळीच्या जीवनात अनेकदा किरकोळ अपघात होऊन खूप मोठे संकट निर्माण करतात. अपघातातून झालेल्या दुखण्याचा उपचार खर्च परवडणारा नसल्याने अडचण होते. महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजनेतून मोठे अर्थसहाय्य मिळते. त्यामुळे मोफतमध्ये आर्थोस्कोपी शस्त्रक्रियेचा लाभ घेता येतो. येथील चिंतामणी हॉस्पिटलमध्ये डॉ. नीलेश येलनारे यांनी आर्थोस्कोपी शस्त्रक्रिया करून एका युवकाला पायावर उभे केले आहे.आर्णी तालुक्यातील गणगाव साकूर येथील युवक स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होता. मित्रासोबत बाहेर जात असताना दुचाकी स्लीप होऊन अपघात झाला. कुठेही मार लागला नाही, मात्र काही दिवसानंतर डाव्या पायाचा टोंगळा काम करणेच बंद झाला. पायावर उभेही राहता येत नव्हते. मोलमजुरी करणाऱ्या कुणाल रामटेके याच्या कुटुंबातील आर्थिक परिस्थिती बेताची होती. डॉक्टरांकडे तपासणी केली असता टोंगळ्यातील लिगामेंट डॅमेज झाल्याचे सांगण्यात आले. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी किमान एक लाख रुपये खर्च येईल असेही नागपूरच्या डॉक्टरांनी कुणालच्या नातेवाईकांना सांगितले. आर्थिक परिस्थिती नसल्याने रामटेके कुटुंबापुढे प्रश्न निर्माण झाला. शेवटी त्यांनी यवतमाळात येऊन येलनारे हॉस्पिटलमध्ये कुणालला दाखल केले. येथे महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ मिळतो, अशी माहिती मिळाली.जीवनदायी योजनेचे जिल्हा समन्वयक सुरेंद्र इरपनवार, विभागीय व्यवस्थापक सुनील वाठोळे, दर्शन चांडक आदींनी कुणालच्या कागदपत्रांची पडताळणी करून वरिष्ठ स्तरावरुन त्याला मान्यता घेतली. डॉ.नीलेश येलनारे यांनी कुणालच्या टोंगळ्यावर आर्थोस्कोपी शस्त्रक्रिया केली. तीन दिवसानंतर कुणाल पूर्ववत चालायला लागला.महागड्या शस्त्रक्रियाही खासगीत होतात मोफतजीवनदायी योजनेतून आर्थोस्कोपी सारखी महागडी शस्त्रक्रिया मोफत होते, यामुळेच मुलाचा पाय बरा झाल्याचे कुणालच्या वडिलांनी सांगितले. महात्मा फुले जीवनदायी योजनेत अनेक महत्वपूर्ण शस्त्रक्रिया होतात, त्याचा अजूनही प्रचार, प्रसार झालेला नाही. रुग्णांनी कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी जीवनदायी आरोग्य योजनेत आपण पात्र ठरतो का याची पडताळणी करावी, असे जिल्हा समन्वयक सुरेंद्र इरपनवार यांनी सांगितले.

टॅग्स :Healthआरोग्य