जीवनदायी योजनेतून आर्थोस्कोपी शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 06:00 AM2020-02-27T06:00:00+5:302020-02-27T06:00:06+5:30

आर्णी तालुक्यातील गणगाव साकूर येथील युवक स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होता. मित्रासोबत बाहेर जात असताना दुचाकी स्लीप होऊन अपघात झाला. कुठेही मार लागला नाही, मात्र काही दिवसानंतर डाव्या पायाचा टोंगळा काम करणेच बंद झाला. पायावर उभेही राहता येत नव्हते. मोलमजुरी करणाऱ्या कुणाल रामटेके याच्या कुटुंबातील आर्थिक परिस्थिती बेताची होती.

Arthroscopy surgery from a life plan | जीवनदायी योजनेतून आर्थोस्कोपी शस्त्रक्रिया

जीवनदायी योजनेतून आर्थोस्कोपी शस्त्रक्रिया

Next
ठळक मुद्देगुडघ्याच्या लिगामेंटवर उपचार : किरकोळ अपघाताने गुडघा झाला होता निकामी

सुरेंद्र राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : धावपळीच्या जीवनात अनेकदा किरकोळ अपघात होऊन खूप मोठे संकट निर्माण करतात. अपघातातून झालेल्या दुखण्याचा उपचार खर्च परवडणारा नसल्याने अडचण होते. महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजनेतून मोठे अर्थसहाय्य मिळते. त्यामुळे मोफतमध्ये आर्थोस्कोपी शस्त्रक्रियेचा लाभ घेता येतो. येथील चिंतामणी हॉस्पिटलमध्ये डॉ. नीलेश येलनारे यांनी आर्थोस्कोपी शस्त्रक्रिया करून एका युवकाला पायावर उभे केले आहे.
आर्णी तालुक्यातील गणगाव साकूर येथील युवक स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होता. मित्रासोबत बाहेर जात असताना दुचाकी स्लीप होऊन अपघात झाला. कुठेही मार लागला नाही, मात्र काही दिवसानंतर डाव्या पायाचा टोंगळा काम करणेच बंद झाला. पायावर उभेही राहता येत नव्हते. मोलमजुरी करणाऱ्या कुणाल रामटेके याच्या कुटुंबातील आर्थिक परिस्थिती बेताची होती. डॉक्टरांकडे तपासणी केली असता टोंगळ्यातील लिगामेंट डॅमेज झाल्याचे सांगण्यात आले. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी किमान एक लाख रुपये खर्च येईल असेही नागपूरच्या डॉक्टरांनी कुणालच्या नातेवाईकांना सांगितले. आर्थिक परिस्थिती नसल्याने रामटेके कुटुंबापुढे प्रश्न निर्माण झाला. शेवटी त्यांनी यवतमाळात येऊन येलनारे हॉस्पिटलमध्ये कुणालला दाखल केले. येथे महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ मिळतो, अशी माहिती मिळाली.
जीवनदायी योजनेचे जिल्हा समन्वयक सुरेंद्र इरपनवार, विभागीय व्यवस्थापक सुनील वाठोळे, दर्शन चांडक आदींनी कुणालच्या कागदपत्रांची पडताळणी करून वरिष्ठ स्तरावरुन त्याला मान्यता घेतली. डॉ.नीलेश येलनारे यांनी कुणालच्या टोंगळ्यावर आर्थोस्कोपी शस्त्रक्रिया केली. तीन दिवसानंतर कुणाल पूर्ववत चालायला लागला.

महागड्या शस्त्रक्रियाही खासगीत होतात मोफत
जीवनदायी योजनेतून आर्थोस्कोपी सारखी महागडी शस्त्रक्रिया मोफत होते, यामुळेच मुलाचा पाय बरा झाल्याचे कुणालच्या वडिलांनी सांगितले. महात्मा फुले जीवनदायी योजनेत अनेक महत्वपूर्ण शस्त्रक्रिया होतात, त्याचा अजूनही प्रचार, प्रसार झालेला नाही. रुग्णांनी कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी जीवनदायी आरोग्य योजनेत आपण पात्र ठरतो का याची पडताळणी करावी, असे जिल्हा समन्वयक सुरेंद्र इरपनवार यांनी सांगितले.

Web Title: Arthroscopy surgery from a life plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य