आर्णी शहर झाले गुटखा तस्करीचे मुख्य केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 00:00 IST2018-03-14T00:00:48+5:302018-03-14T00:00:48+5:30

येथील डोंगा ले-आऊट गुटख्याचा अड्डा बनले असून येथूनच सर्वत्र गुटखा पोहोचविला जात आहे.

Arni city became the main center of Gutka smuggling | आर्णी शहर झाले गुटखा तस्करीचे मुख्य केंद्र

आर्णी शहर झाले गुटखा तस्करीचे मुख्य केंद्र

ठळक मुद्देसर्वांचेच दुर्लक्ष : डोंगा ले-आउटमध्ये अड्डा, अन्न व औषध प्रशासन मूग गिळून

राजेश कुशवाह ।
ऑनलाईन लोकमत
आर्णी : येथील डोंगा ले-आऊट गुटख्याचा अड्डा बनले असून येथूनच सर्वत्र गुटखा पोहोचविला जात आहे.
तालुक्यातील ग्रामीण भागासह जिल्ह्यातील इतरही भागात या डोंगा ले-आउटमधून गुटखा पोहोचविला जातो. गेल्या कित्येक महिन्यांपासून ही गुटखा तस्करी सुरू आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक खेड्यात बिनदिक्कतपणे गुठगा पोहोचविला जात आहे. त्यासाठी दोन वाहनांचा वापर केला जात आहे. विशेष म्हणे आर्णी तालुक्यातील एक गुटखा व्यावसायीक उमरखेडमध्ये तळ ठोकून आहे. तेथील पोलिसांसोबत त्याचे ‘अर्थपूर्ण’ संबंध गुटखा तस्करीला चांगलाच जोर आला आहे.
आर्णी पोलीस व यवतमाळ येथील वरिष्ठांनीही गुटखा तस्करी करणाºयांना खुली सूट दिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गुटखा तस्करी राजरोसपणे सुरू आहे. अनेक बालक गुटख्याला बळी पडत आहे. पोलिसांना मात्र दर महिन्याला आर्थिक रसद मिळत असल्याने ज्या मार्गाने गुटखा भरलेली वाहने जातात, तिकडे कुणी फिरकत नाही. संबंधित सर्वच पोलीस ठाण्यातील कर्मचाºयांना दरमहा ठरावीक मलिदा मिळत असल्याने ते या तस्करीकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. मात्र सामान्यांची आरोग्य धोक्यात सापडले आहे.
कारवाईस कुणीच धजावत नाही
कोणत्याही विभागाचे अधिकारी गुटखा तस्करांवर कारवाई करण्यास धजावत नाही. गुटख्याला बंदी असूनही खुलेआम तस्करी होत असताना अधिकारी, कर्मचारी मूग गिळून आहे. कारंजा, अमरावती हे गुटख्याचे मुख्य केंद्र असून तेथूनच प्रत्येक तालुक्यात गुटखा पोहोचविला जातो. आर्णीतील डोंगा ले-आऊट आता जिल्ह्यातील मुख्य केंद्र बनले आहे. दररोज सायंकाळी येथून लाखो रूपयांचा गुटख्याची तस्करी केली जात आहे. मात्र ‘अर्थपूर्ण’ संबंधामुळे कुणीही कारवाईस धजावत नसल्याचे चित्र आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे.

Web Title: Arni city became the main center of Gutka smuggling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.