नळासाठी अर्जांचा खच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 10:54 PM2018-09-19T22:54:11+5:302018-09-19T22:54:31+5:30

यवतमाळ शहरात विकासाच्या नावाखाली चौफेर रस्ते खोदले गेले आहे. तर कुठे रस्त्यांना भगदाड पडले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन ठिकठिकाणी लिकेजेस झाल्या आहे. तेथून हजारो लिटर पाणी वाहून जात आहे.

Application expenditure for the tap | नळासाठी अर्जांचा खच

नळासाठी अर्जांचा खच

googlenewsNext
ठळक मुद्दे‘मजीप्रा’ : खोदकामामुळे ठिकठिकाणी लिकेज, पाण्याचा अपव्यय

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : यवतमाळ शहरात विकासाच्या नावाखाली चौफेर रस्ते खोदले गेले आहे. तर कुठे रस्त्यांना भगदाड पडले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन ठिकठिकाणी लिकेजेस झाल्या आहे. तेथून हजारो लिटर पाणी वाहून जात आहे. अशा तुटलेल्या पाईपलाईन तातडीने जोडण्यात याव्या म्हणून यवतमाळ शहरातून शेकडो अर्ज जीवन प्राधिकरणाकडे पोहोचल्याची माहिती आहे. मात्र प्राधिकरणाकडून तेवढ्या तत्परतेने त्याची दखल घेऊन नळ जोडणी पूर्ववत करण्याचे काम होताना दिसत नाही.
अमृत योजनेअंतर्गत बेंबळा प्रकल्पावरून यवतमाळ शहरासाठी पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्याकरिता बेंबळावरून थेट निळोणा प्रकल्पावर जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी शहरात मोठ्या प्रमाणात खोदकाम झाले आहे. याशिवाय रस्त्याची कामे सुरू आहेत. अनेक ठिकाणी डांबर वाहून गेल्याने रस्ते उघडे पडले आहे. रस्त्यांना जागोजागी खोल खड्डे पडले आहे. या कारणांनी जीवन प्राधिकरणाच्या पाईपलाईन डॅमेज झाल्या आहेत. त्यातून हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होतो आहे. लिकेजेसमुळे नागरिकांना आधीच पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा होत नाही. अखेरच्या घरापर्यंत पाणी पोहोचत नाही, ज्यांना पाणी मिळते ते दूषित आहे. त्यामुळे नागरिकांनी लिकेजेस बंद करून नळ जोडणी करून द्यावी म्हणून जीवन प्राधिकरणाकडे तोंडी व लेखी स्वरूपात तक्रारी, विणवण्या केल्या आहेत. मात्र प्राधिकरणाचे काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे लिकेजेस, पाण्याचा अपव्यय, दूषित पाणीपुरवठा जैसे थे आहे.
अमृत योजनेंतर्गत शहरात नव्यानेच टाकलेले पाईपही अनेक ठिकाणी लिक आहेत. योजना पूर्ण होण्यापूर्वीच दुरुस्तीच्या कामावर आली आहे. या कामांचीही चौकशी होण्याची गरज आहे.
सराफा बाजारातील लिकेजेस चक्क नालीत
यवतमाळच्या गांधी चौकातील सराफा बाजाराच्या ओळीत नालीतून गेलेली पाईपलाईन गेल्या कित्येक महिन्यांपासून फुटलेली आहे. त्यातून पाणी वाहते आणि त्यात नालीतील दूषित पाणी जाऊन ते घराघरात पोहोचते. याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्राधिकरणाने ते लिकेजेस बंद करण्याची तसदी घेतली नाही, हे विशेष.

Web Title: Application expenditure for the tap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.