यवतमाळ जिल्ह्यात आणखी एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 19:33 IST2020-05-23T19:32:52+5:302020-05-23T19:33:11+5:30
यवतमाळ जिल्ह्यात पुणे येथून आलेल्या व्यक्तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे आता अॅक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १७ झाली आहे. सदर व्यक्ती कळंब येथील असून सध्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये भरती आहेत.

यवतमाळ जिल्ह्यात आणखी एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: जिल्ह्यात पुणे येथून आलेल्या व्यक्तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे आता अॅक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १७ झाली आहे. सदर व्यक्ती कळंब येथील असून सध्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये भरती आहेत. सद्यस्थितीत वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये १७ ?क्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांसह एकूण 22 जण आहे. यात सहा प्रिझमटिव्ह केसेस असल्याचे वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने कळविले आहे.
आज (दि.23) दोन जण आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती झाले आहे. आतापर्यंत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून एकूण १८९४ नमुने तपासणीकरीता पाठविले. यापैकी १८८७ रिपोर्ट प्राप्त तर सात रिपोर्ट अप्राप्त आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत १७७५ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तसेच जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ११३ वर गेली असून यापैकी ९६ रुग्ण उपचाराअंती बरे होऊन घरी गेले आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डमध्ये १७ अॅक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्ण भरती आहेत. संस्थात्मक विलगीकरण कक्षात १५ जण तर गृह विलगीकरणात ४८६ जण आहेत.