अन् उमरखेडमध्ये डॉक्टरांच्या डोळ्यात अश्रू तरळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 05:00 IST2020-04-18T05:00:00+5:302020-04-18T05:00:19+5:30
महिनाभरापासून येथील शासकीय रुग्णालयातील डॉक्टर विविध साहित्याशिवाय कोरोनाशी लढा देत आहे. आपला जीव धोक्यात घालून ते जनतेला वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. याबाबतचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच इनरव्हील क्लबने त्याची दखल घेतली. त्यांनी लगेच डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी पीपीई किट, हॅन्ड ग्लोब्ज, मास्क, सॅनिटायझर आदी साहित्य खरेदी केले.

अन् उमरखेडमध्ये डॉक्टरांच्या डोळ्यात अश्रू तरळले
अविनाश खंदारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : गेल्या महिनाभरापासून येथील शासकीय रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी शस्त्राविना कोरोनाशी लढा देत आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच इनरव्हील क्लबने दखल घेवून या सर्वांसाठी विविध साहित्याची उपलब्धता करून दिली. यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.
महिनाभरापासून येथील शासकीय रुग्णालयातील डॉक्टर विविध साहित्याशिवाय कोरोनाशी लढा देत आहे. आपला जीव धोक्यात घालून ते जनतेला वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. याबाबतचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच इनरव्हील क्लबने त्याची दखल घेतली. त्यांनी लगेच डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी पीपीई किट, हॅन्ड ग्लोब्ज, मास्क, सॅनिटायझर आदी साहित्य खरेदी केले. हे साहित्य वैद्यकीय अधिकारी डॉ.रमेश मांडन, डॉ.हनुमंत धर्मकारे यांच्या सुपूर्द केले.
यावेळी डॉ.यादवराव राऊत, डॉ.विमल राऊत, इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष जयमाला लाडे, कुसूम गिरी, सुमन हस्तरकर, वैशाली धोंगडे आदी उपस्थित होत्या. इनरव्हील क्लबने आारेग्य कर्मचाऱ्यांची समस्या लक्षात घेवून त्यांना साहित्य भेट दिले. यामुळे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी भारावून गेले. हे साहित्य स्वीकारताना डॉक्टर व आरोग्य कर्मचाºयांच्या डोळ्यात नकळत अश्रू तरळले. समाजाने आपली दखल घेतल्याची भावना त्यांच्या चेहºयावर दिसून आली.
जनतेची काळजी
तब्बल १०० डॉक्टर व आरोग्य कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून जनतेची काळजी घेत आहे. मात्र त्यांच्याकडे कुणाचे लक्ष नाही. तथापि ते प्रामाणिकपणे आपली सेवा देत आहे. इनरव्हील क्लबने त्यांची दखल घेतल्याबद्दल या सर्वांनी आभार व्यक्त केले.