शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकरवादी संघटनांचे निवेदन

By admin | Updated: January 21, 2016 02:19 IST

हैदराबाद विद्यापीठांतर्गत शिक्षण घेणारा रोहित वेमुला या विद्यार्थ्याच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्यांवर

विद्यार्थी आत्महत्याप्रकरण : कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारायवतमाळ : हैदराबाद विद्यापीठांतर्गत शिक्षण घेणारा रोहित वेमुला या विद्यार्थ्याच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी आंबेडकरवादी संघटनांनी बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय, विधान परिषद सदस्य रामचंद्र राव, कुलगुरू आप्पाराव पोडिले आणि अभाविपचे सुशील कुमार व कृष्णा चैतन्य यांना तत्काळ अटकेची मागणी करण्यात आली आहे.सदर प्रकरणाची निपक्षपाती चौकशी करून अ.जा. व अ.ज. अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करावा, चार विद्यार्थ्यांचे निलंबन रद्द करून त्यांना पूर्ववत प्रवेश द्यावा, रोहित वेमुला याच्या थकीत फेलोशीपची रक्कम आणि शासकीय मदत रुपये ५० लाख त्याच्या कुटुंबीयांना द्यावी, एका व्यक्तीस शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. अनुसूचित जाती, जमातीच्या विद्यार्थ्यांना संरक्षणासाठी ठोस उपाययोजना कराव्या, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यासंदर्भात तत्काळ निर्णय न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. निवेदन सादर करताना नॅशनल आंबेडकराईट गार्डचे (नाग) आनंद गायकवाड, समता सैनिक दलाचे धम्मा कांबळे, भारतीय बौद्ध महासभेचे धर्मपाल माने, प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघाचे प्रा. के.डी. भगत, महाराष्ट्र आॅफिसर्स फोरमचे नामदेव स्थूल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स असोसिएशनचे अ‍ॅड. जयसिंह चव्हाण, बहुजन रिप. सोशॅलिस्ट पार्टीचे सुनील पुनवटकर, दशरथ मडावी, बळी खैरे, म.ना. गजभिये, नवनीत महाजन, धनंजय गायकवाड, अ‍ॅड. गोविंद बन्सोड, गोविंद मेश्राम, रमेश जीवने, श्रीकांत खोब्रागडे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)