आंबेडकरी युवा साहित्य संमेलनाची जय्यत तयारी

By Admin | Updated: January 15, 2017 01:17 IST2017-01-15T01:17:48+5:302017-01-15T01:17:48+5:30

सातवे आंबेडकरी युवा साहित्य संमेलन २६ फेब्रुवारी रोजी येथे आयोजित करण्यात आले आहे.

Ambedkar Young Literary Meet | आंबेडकरी युवा साहित्य संमेलनाची जय्यत तयारी

आंबेडकरी युवा साहित्य संमेलनाची जय्यत तयारी

परिसंवाद, परिचर्चा : देशभरातील साहित्यिक
यवतमाळ : सातवे आंबेडकरी युवा साहित्य संमेलन २६ फेब्रुवारी रोजी येथे आयोजित करण्यात आले आहे. यात देशभरातील नामवंत साहित्यिक, कलावंतांचा सहभाग राहणार आहे. आंबेडकरी साहित्य व कला अकादमी आणि आंबेडकराईट गार्ड (नाग) संघटनेच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
उद्घाटन सोहळा, महिला परिसंवाद, परिचर्चा, आंबेडकरी लोक न्यायालय, कविसंमेलन, विविध नाट्य प्रयोग व सांस्कृतिक जलसा आदी कार्यक्रम या संमेलनात होणार आहे. चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेते मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव हे विशेष आमंत्रित आहेत. डॉ. महेंद्र भवरे, डॉ. मंगेश बनसोड, राही भिडे, डॉ. अनिल सूर्या, निकेश जिल्ठे, प्रा. डॉ. शामल बनसोड, डॉ. अशोक इंगळे, प्रा. सतेश्वर मोरे, वंदना जीवने, संजय डोंगरे, तक्षशीला वाघदरे, डॉ. कमलाकर पायस, प्रा. अनिता कांबळे, संदीप भगत, प्रा. डॉ. अनिल काळबांडे, प्रा. प्रेम हनवते, जयंत साठे, प्रशांत वंजारे आदी साहित्य व कला क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती आंबेडकरी साहित्य व कला अकादमीचे सचिव आनंद गायकवाड यांनी कळविली आहे.
एका बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अकादमीचे अध्यक्ष गोपीचंद कांबळे, बळी खैरे, कवडूजी नगराळे आदी सदस्य या बैठकीला उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Ambedkar Young Literary Meet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.