यवतमाळात मुस्लीम बांधवांचा अमन मार्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 22:49 IST2017-08-13T22:48:38+5:302017-08-13T22:49:04+5:30

समाजात एकता आणि शांतता निर्माण व्हावी यासाठी जमियत उल्मा हिंदच्यावतीने यवतमाळ शहरातून रविवारी अमन मार्च काढण्यात आला.

Aman march of Muslim brothers in Yavatmal | यवतमाळात मुस्लीम बांधवांचा अमन मार्च

यवतमाळात मुस्लीम बांधवांचा अमन मार्च

ठळक मुद्दे ‘नफरत मिटाओ देश बचाओ’, हिंदू, मुस्लीम, शिख, इसाई आपसमे सब भाई-भाई

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : समाजात एकता आणि शांतता निर्माण व्हावी यासाठी जमियत उल्मा हिंदच्यावतीने यवतमाळ शहरातून रविवारी अमन मार्च काढण्यात आला. या मार्चमध्ये मोठ्या संख्येने मुस्लीम बांधव सहभागी झाले होते.
यवतमाळच्या कळंब चौकातून अमन मार्चला प्रारंभ झाला. शहरातील विविध मार्गाने मार्गक्रमण करीत या मार्चचा कळंब चौकातच समारोप झाला. मार्चमध्ये देण्यात आलेल्या घोषणांनी यवतमाळकरांचे लक्ष वेधले. ‘नफरत मिटाओ देश बचाओ’, हिंदू, मुस्लीम, शिख, इसाई आपसमे सब भाई-भाई अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी आयोजित प्रबोधन सभेत देशाची एकता आणि अखंडता याला किती महत्व आहे. यावर मार्गदर्शन करण्यात आले. पवित्र कुराण आणि महंमद पैगंबराचे एकतेचे विचार मांडण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष मुफ्ती एजाज साहब, मौलाना शारिक, मुफ्ती इनाम, वसीम खान, मोहीब अफतर, हाफीज नसीम, वसीम रिहाज हुसेन सिद्दीकी, जियाभाई, हाफीज इब्राहीम, शबीर भाई, मौसीन खान, शेर खान, मौलीन उसामा, हाफीज मन्सूर, मौलाना नजीम, हाफीज नईम यांच्यासह आराकिने जमीयत संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Aman march of Muslim brothers in Yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.