शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

नियुक्तीसोबतच आता पदोन्नतीसाठीही टीईटीचे बंधन

By अविनाश साबापुरे | Updated: July 15, 2023 16:33 IST

गुरुजींचे वाढले टेन्शन : नव्या अटीने विषय शिक्षकांच्या जागा भरण्याचा पेच

यवतमाळ : प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळांमध्ये नियुक्तीसाठी शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. परंतु, आता शिक्षकांच्या पदोन्नती प्रक्रियेसाठीदेखील टीईटीचे बंधन घालण्यात आल्याने राज्यभरातील गुरुजींची भंबेरी उडाली आहे. एनसीटीईच्या अधिसूचनेचा संदर्भ देऊन शिक्षण संचालकांनी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना याबाबत अवगत केले आहे. परंतु, या अटीमुळे सर्वच जिल्ह्यातील विषय शिक्षकांच्या हजारो रिक्त जागा भरणे प्रशासनालाही कठीण झाले आहे.

उच्च प्राथमिक वर्गांसाठी म्हणजेच सहावी ते आठवीच्या वर्गांसाठी आरटीई कायद्यानुसार विषय शिक्षकांची नेमणूक करणे बंधनकारक आहे. त्याकरिता शिक्षण विभाग शिक्षकांपैकीच जे संबंधित विषयात पदवीधर आहेत, त्यांची विषय शिक्षक म्हणून बढती करतो. परंतु, गेल्या दहा वर्षात शिक्षकांच्या भरतीची प्रक्रियाच न झाल्याने अशा विषय शिक्षकांच्या नेमणुकाही रखडल्या. सध्या महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये विषय शिक्षकांची हजारो पदे रिक्त आहेत. त्यामुळे पदोन्नतीकरिता विविध शिक्षक संघटनांनी गेल्या काही महिन्यांपासून प्रशासनाकडे धोशा लावला आहे.

परंतु, आता या पदोन्नतीकरिता एखादा शिक्षक संबंधित विषयात केवळ पदवीधर असणेच पुरेसे नसून त्यासाठी तो टीईटी परीक्षासुद्धा उत्तीर्ण असणे आवश्यक करण्यात आले आहे. शिक्षण संचालकांनी यासंदर्भात व्हीडिओ काॅन्फरन्सद्वारे सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना तोंडी सूचनाही दिल्या आहेत. त्यामुळे सर्वच जिल्ह्यातील विषय शिक्षक पदोन्नती प्रक्रिया रखडली आहे.अशा प्रकारचे बंधन घालताना राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषदेच्या (एनसीटीई) २०१४ मधील अधिसूचनेचा संदर्भही देण्यात आला आहे. प्रत्यक्षात टीईटी परीक्षेची अमलबजावणी २०१३ पासून सुरू झाली. पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेले शिक्षक हे २०१३ पूर्वी सेवेत लागलेले आहेत. त्यांना यातील कोणाकडेही आता टीईटी प्रमाणपत्र नाही. त्यामुळे विषय शिक्षक म्हणून नेमके कुणाला पदोन्नत करावे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर तोडगा न निघाल्यास आरटीई कायद्यातील विषय शिक्षक नेमणुकीच्या तरतुदीचाही भंग होणार आहे.

ही पदोन्नती की पदस्थापना?

एनसीटीईच्या अधिसूचनेचा अर्थ नेमका काय यावरून आता शिक्षक आणि प्रशासनात वेगवेगळा मतप्रवाह आहे. एखाद्या शिक्षकाला विषय शिक्षक करणे ही पदोन्नती ठरते की पदस्थापना असा प्रश्न पुढे आला आहे. आरटीईनुसार शिक्षकाची नेमणूक करताना तो टीईटी उत्तीर्ण असण्याचे बंधन आहे. परंतु विषय शिक्षक ही पदोन्नती प्रक्रिया असल्याने त्यासाठी टीईटीची गरज नाही, असा दावा शिक्षक संघटनांकडून केला जात आहे. तर विषय शिक्षक ही पदोन्नती प्रक्रिया नसून ती नवीन प्रकारची पदस्थापना आहे, त्यामुळे तेथेही टीईटीची अट लागू होते, असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.

बाॅक्सहजारो शिक्षकांना पदावनत करण्याचे आदेशआरटीईनुसार पदवीधन विषय शिक्षक नेमणे आवश्यक असल्यामुळे राज्य शासनाने २०१६ मध्ये केवळ बारावी उत्तीर्ण असलेल्या शिक्षकांना पदवीधर शिक्षक म्हणून पदोन्नती दिली. परंतु, आता एनसीटीईच्या अधिसूचनेनुसार शिक्षकाची एका स्तरातून दुसऱ्या स्तरात पदोन्नती करताना आवश्यक अहर्ता धारण करणे आवश्यक ठरले आहे. त्यामुळे ज्या बारावी उत्तीर्ण शिक्षकांना यापूर्वी पदोन्नती देण्यात आली, त्यांना आता पूर्वपदावर पदस्थापना देण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील हजारो विषय शिक्षक पदावनत होणार आहेत. प्रत्यक्षात आधीच विषय शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने कोणत्याही जिल्हा परिषदेने ही पदावनती प्रक्रिया सुरू केलेली नाही.

एनसीटीईच्या अधिसूचनेनुसार आता विषय शिक्षकांनाही टीईटी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. शिक्षण संचालकांनी व्हीसी घेऊन याबाबत सूचना दिली आहे. सर्वच जिल्ह्यातील पदोन्नती प्रक्रिया त्यामुळे थांबलेली आहे. ज्या जिल्ह्यात पदोन्नती झाली, ती अडचणीत येण्याची शक्यता आहे. परंतु, हा तिढा महिनाभरात सुटेल, अशी चिन्हे दिसत आहेत.- किशोर पागोरे, शिक्षणाधिकारी, यवतमाळ