कीटकनाशक फवारणीतून विषबाधेवर यंत्रणा सतर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 09:56 PM2019-08-19T21:56:45+5:302019-08-19T21:58:25+5:30

कीटकनाशक फवारणीतून विषबाधा टाळण्यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. यादृष्टीने प्रामुख्याने आरोग्य विभागाला विशेष सूचना देण्यात आल्या आहे. २०१७ ची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे.

Alert the system on poisoning by spraying pesticides | कीटकनाशक फवारणीतून विषबाधेवर यंत्रणा सतर्क

कीटकनाशक फवारणीतून विषबाधेवर यंत्रणा सतर्क

Next
ठळक मुद्देआरोग्य विभागाला विशेष सूचना : २०१७ ची पुनरावृत्ती टाळण्याचे प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कीटकनाशक फवारणीतून विषबाधा टाळण्यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. यादृष्टीने प्रामुख्याने आरोग्य विभागाला विशेष सूचना देण्यात आल्या आहे. २०१७ ची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे.
कीटकनाशक फवारणीतून विषबाधा झाल्याने सन २०१७ मध्ये एकट्या यवतमाळ जिल्ह्यात २२ शेतकरी, शेतमजुरांचा मृत्यू झाला होता. विदर्भात हा आकडा ४३ वर पोहोचला होता. एक हजार ८०० शेतकरी, शेतमजूर बाधित झाले होते. हा प्रकार दिल्लीपर्यंत पोहोचला. संपूर्ण प्रशासन हादरून गेले होते. यावर अनेक उपाय करण्यात आले. २०१८ मध्येही उपायांची मालिका सुरूच ठेवण्यात आली. त्यामुळे विषबाधा बळीचे प्रमाण अतिशय नगण्य राहिले.
आता चालू हंगामात कीटकनाशक फवारणीमुळे शेतकरी, शेतमजुरांना बाधा होऊ नये यासाठी काय खबरदारी घ्यावी, याच्या मार्गदर्शक सूचना आरोग्य सेवा उपसंचालक अकोला यांनी केल्या आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सकांना याविषयीची माहिती कळविण्यात आली आहे. प्रामुख्याने कापूस, सोयाबीन, तूर या पिकावर कीटकनाशक फवारणी करणाऱ्या शेतमजुरांची नि:शुल्क आरोग्य तपासणी करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयामार्फत विशेष अभियान राबविले जाणार आहे. कीटकनाशक फवारणी करताना शेतकरी, शेतमजुरांनीही दक्षता घेणे गरजेचे आहे.
आरोग्य तपासणीसाठी प्रवृत्त करणार
कीटकनाशक फवारणी करणाऱ्या शेतकरी, शेतमजुरांना आरोग्य तपासणी करून घेण्यासाठी प्रवृत्त केले जाणार आहे. तपासणी झाली असलेल्या मजुरांना आरोग्य विभागातर्फे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे घेतल्या जाणाऱ्या उपक्रमांचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा, यासाठी प्रयत्न करावे, अशा सूचना आरोग्य सेवा उपसंचालकांनी केल्या आहेत. तसे पत्र अमरावती विभागाच्या पाचही जिल्ह्यातील जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सकांना पाठविण्यात आले आहे.

Web Title: Alert the system on poisoning by spraying pesticides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.