गॅस सिलिंडरच्या वाहनात दारू तस्करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 05:00 IST2020-05-03T05:00:00+5:302020-05-03T05:00:58+5:30
शेतशिवारात काढलेली हातभट्टीची दारू विक्रीसाठी आणण्यासाठी कोणाला संशय येणार नाही अशा वाहनाचा उपयोग केला जात आहे. गॅस सिलिंडर डिलिव्हरी अत्यावश्यक सेवेत मोडते. त्याच ऑटोमधून दारू विक्रीसाठी आणण्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला.

गॅस सिलिंडरच्या वाहनात दारू तस्करी
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : लॉकडाऊनमध्येही बंद दारू दुकानातील स्टॉक पद्घतशिरपणे रिकामा केला जात आहे. तर काहींनी गावठी दारू विक्री सुरु केली. अवधूतवाडी पोलिसांनी केलेल्या कारवाईत गॅस सिलिंडरची डिलिव्हरी करणाऱ्या ऑटोतूनच दारू तस्करी होत असल्याचा प्रकार उघड झाला.
शेतशिवारात काढलेली हातभट्टीची दारू विक्रीसाठी आणण्यासाठी कोणाला संशय येणार नाही अशा वाहनाचा उपयोग केला जात आहे. गॅस सिलिंडर डिलिव्हरी अत्यावश्यक सेवेत मोडते. त्याच ऑटोमधून दारू विक्रीसाठी आणण्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला. दत्त गॅस एजन्सी आर्णी रोड यांच्या ऑटोमधून (क्रं. एमएच २९-बिडी १११५) गावठी दारू जात असल्याची गोपनिय माहिती जमादार सुरेश मेश्राम यांना मिळाली. यावरून आर्णी नाक्यावर हा ऑटो थांबून झडीती घेतली. त्यामध्ये १५ लिटर दारूची डबकी मिळून आली. चालक मारोती चंपत टेकाम (३८), राहूल चंद्रकार बिजवे (३२) रा. तंबाखे लेआऊट यांना अटक करून अवधूतवाडी ठाण्यात गुन्हा नोंदविला. दुसºया कारवाईत एलसीबीने पाटीपुºयातून दोन लाखांची देशीदारु व मुद्देमाल जप्त केला. अमोल श्रावण तेलतुंबडे (३७) रा. आंबेडकरनगर यांच्या घरातून गावठी दारू जप्त केली. टोळीविरोधी पथकाचे प्रमुख मिलन कोयल, विनोद चव्हाण, शहर ठाणे शोधपथकाने कारवाई केली.