शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
4
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
5
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
6
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
7
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
8
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
9
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
10
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
11
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
12
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
13
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
14
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
15
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
16
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
17
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
18
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
19
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
20
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

यवतमाळमध्ये चार मंत्री असूनही पाच वर्षात काय विकास झाला? अजित पवार यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 12:47 IST

राज्यातील राजकीय पक्षांतरामुळे स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. उमेदवारी दाखल करताना प्रचंड गोंधळ उडणार असल्याचं राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.

ठळक मुद्दे'राज्यातील राजकीय पक्षांतरामुळे स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे.''जिल्ह्यात चार मंत्री असून देखील पाच वर्षात काय विकास झाला? उलट कंपन्यांनी कामगार कपात केली.'पूरग्रस्तांना शासनाने कोणतीच मदत वेळेत दिली नाही, असा आरोप ही अजित पवार यांनी केला.

यवतमाळ - राज्यातील राजकीय पक्षांतरामुळे स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. उमेदवारी दाखल करताना प्रचंड गोंधळ उडणार असल्याचं राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. अजित पवार यांनी बुधवारी (21 ऑगस्ट) यवतमाळमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी राज्यातील शासन सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. तसेच यवतमाळ जिल्ह्यात चार मंत्री असून देखील पाच वर्षात काय विकास झाला? उलट येथील कंपन्यांनी कामगार कपात केली आहे असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. 

युती सरकार केवळ खोटे आश्वासन देण्यात व्यस्त आहे, पूरग्रस्तांना शासनाने कोणतीच मदत वेळेत दिली नाही, असा आरोप ही अजित पवार यांनी केला आहे. खासदार अमोल कोल्हे, वक्ते अमोल मिटकरी, आमदार ख्वाजा बेग, माजी आमदार संदीप बाजोरिया हे देखील यावेळी  उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमधील दिग्गज नेते शिवसेना आणि भाजपात जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी फेसबुक आणि ट्विटरवरुन गौप्यस्फोट केला आहे. आगामी विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्यापुर्वी राज्यात अफवांना अजून पेव फुटेल. भाजपा-शिवसेनेचेही अनेक जुने नेते नाराज आहेत, असे अजित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे भाजपा-शिवसेनेच कोणते जुने नेते नाराज आहेत? असा प्रश्न उपस्थित होत आहे.  

भाजपात माजी मंत्री एकनाथ खडसेंची नाराजी सर्वपरिचीत आहे. अनेकवेळा खडसेंनीही ते जाहीरपणे बोलून दाखवले आहे. मात्र, मी भाजपा सोडणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. तर, अजित पवारांच्या ट्विटमुळे पुन्हा एकदा भाजपा आणि शिवसेनेतील ते जुने आणि ज्येष्ठ नेते कोण ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत, उमेदवाऱ्या जाहीर झाल्यानंतरच चित्र स्पष्ट होईल, असेही अजित पवार यांनी म्हटलं आहे.  तसेच, सध्या आर्थिक मंदी, बेरोजगारी अशा लोकांच्या प्रश्नांकडे लक्ष देणं गरजेचं असल्याचंही ते म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादीला रामराम करुन भाजपात जाणार असल्याची चर्चा आहे. तर, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा कौर यांनीही विधानसभेला राष्ट्रवादीच्या तिकीटावर आपली लढाई नसेल हे स्पष्ट केलं आहे. तसेच, राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल, करमाळ्याच्या नेत्या रश्मी बागल आणि राष्ट्रवादीचे इतरही काही नेते भाजपा-शिवसेनेत जात असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी हे ट्विट केल्याचं दिसून येत आहे. 

 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारYavatmalयवतमाळNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा