कृषी विभागाचे दुर्लक्ष खपवून घेणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 23:12 IST2017-10-26T23:12:02+5:302017-10-26T23:12:13+5:30
फवारणीतून झालेल्या विषबाधेमुळे अनेकांना आपला प्राण गमवावा लागला, शेकडो लोकांना शारीरिक दूखापती झाल्या. या प्रकाराला अनेक घटक जबाबदार असले, तरी कृषी विभाग आपली जबाबदारी झटकू शकत नाही.

कृषी विभागाचे दुर्लक्ष खपवून घेणार नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : फवारणीतून झालेल्या विषबाधेमुळे अनेकांना आपला प्राण गमवावा लागला, शेकडो लोकांना शारीरिक दूखापती झाल्या. या प्रकाराला अनेक घटक जबाबदार असले, तरी कृषी विभाग आपली जबाबदारी झटकू शकत नाही. यापुढे कृषी विभागाचे दुर्लक्ष कदापि खपवून घेणार नाही, असा ईशारा आमदार डॉ. अशोक उईके यांनी दिला.
येथील बाजार समितीमध्ये आयोजित कृषी नियोजन कार्यशाळेत आमदार डॉ. उईके बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून बाजार समितीचे सभापती प्रवीण देशमुख, पणन महासंघाचे संचालक सुरेश चिंचोळकर, उपविभागीय कृषी अधिकारी कैलास वानखडे, तहसीलदार रणजित भोसले, गटविकास अधिकारी डॉ. मनोहर नाल्हे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रवी पाटील, बाजार समितीचे संचालक आनंदराव जगताप, सरपंच किशोर जगताप, महावितरणच्या यामिनी पिंपळे, संजय पाठक, भाजपाचे तालुकाध्यक्ष कैलास बोंद्रे, किशोर अंबरकर आदी उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार म्हणाले, यापुढे कृषी कर्मचारी व अधिकाºयांची जबाबदारी निश्चित करा. तसा फलक दर्शनी भागावर लावा. यापुढे विषबाधेसारखे प्रकार घडल्यास कृषी विभागाला सोडले जाणार नाही. तसेच विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाºयांनाही त्यांनी चांगलेच धाºयावर धरले. यावेळी त्यांच्या हस्ते शेतकºयांना फवारणीसंदर्भात सुरक्षा कीट वितरीत करण्यात आल्या.