रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेत शिवाराची इत्यंभूत माहिती गोळा करण्यासाठी केंद्र सरकारच्यावतीने जनगणनेच्या धर्तीवर कृषी गणना सुरू आहे. या जनगणनेतून एकत्रित झालेला डाटा आॅनलाईन होणार आहे. या माहितीच्या आधारेच भविष्यात योजनांची अंमलबजावणी केली जाणार आहे.दर पाच वर्षांनी कृषी गणना केली जाते. यंदा दहावी कृषी गणना सुरू आहे. ही नोंदणी आॅनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. यामध्ये पडिक क्षेत्राच्या नोंदी घेतल्या जात आहे. त्यासाठी महसुली यंत्रणा काम करीत आहे. कृषी गणनेत अल्पभूधारक, बहूभूधारक आणि बागायती क्षेत्रासोबतच पडिक जमिनीची नोंद घेतली जात आहे. यामुळे कृषी क्षेत्र आणि त्यात ठिकाणच्या सिंचनाच्या बाबींचा अंदाज घेण्यास मदत होणार आहे. संपूर्ण शेतशिवाराचा डाटा आॅनलाईन फिड होणार असल्याने भविष्यातील कृषी संदर्भातील योजनांची अंमलबजावणी करणे सोपे जाणार आहे.संगणक प्रणालीची गती मंदावलीया कृषी गणनेचा पहिला टप्पा शेवटच्या चरणात आहे. १५ मार्चपर्यंत पहिला टप्पा पूर्ण करण्याच्या सूचना होत्या. परंतु संगणक प्रणाली मंद असल्याने अडचणी येत आहे. यवतमाळ जिल्ह्यात तर आतापर्यंत आठ टक्के आॅनलाईन नोंदणी घेण्यात आल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यात या प्रक्रियेत १६ तहसीलदार, १६ नायब तहसीलदार, ६२८ तलाठी, १०१ मंडळ अधिकारी, वेब मॅनेजर आणि जिल्हास्तरावरील सहा अधिकारी काम करीत आहे.
जनगणनेच्या धर्तीवर आता कृषीगणना; शेतशिवाराचा डाटा आॅनलाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 12:33 IST
शेत शिवाराची इत्यंभूत माहिती गोळा करण्यासाठी केंद्र सरकारच्यावतीने जनगणनेच्या धर्तीवर कृषी गणना सुरू आहे. या जनगणनेतून एकत्रित झालेला डाटा आॅनलाईन होणार आहे.
जनगणनेच्या धर्तीवर आता कृषीगणना; शेतशिवाराचा डाटा आॅनलाईन
ठळक मुद्देशेतीची इत्यंभूत माहिती केंद्र व राज्य सरकारकडे