यवतमाळात लग्नसेवा व्यावसायिकांचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2020 15:00 IST2020-11-02T14:57:47+5:302020-11-02T15:00:04+5:30
corona Yawatmal news कोरोना व लॉकडाऊनमुळे गेल्या सहा-सात महिन्यांपासून लग्न सेवा देणाऱ्या व्यावसायिकांचे कामबंद आहे. त्यामुळे त्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ आली आहे.

यवतमाळात लग्नसेवा व्यावसायिकांचे धरणे आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोना व लॉकडाऊनमुळे गेल्या सहा-सात महिन्यांपासून लग्न सेवा देणाऱ्या व्यावसायिकांचे कामबंद आहे. त्यामुळे त्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ आली आहे. कार्यक्रमांना किमान २०० जणांची परवानगी द्यावी या मागणीसाठी सोमवार २ नोव्हेंबरपासून लग्नसेवा व्यावसायिकांनी यवतमाळातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे.
मंडप डेकोरेशन, साऊंड सर्व्हीस, कॅटरींग सर्व्हीस, घोडेवाले व इतर सलंग्न व्यावसायिक या आंदोलन सहभागी झाले आहे. केंद्र शासनाने दोनशे जणांना कार्यक्रमात सहभागी होण्याची परवानगी दिली आहे. राज्य शासनाने मात्र ही परवानगी अवघ्या ५० व्यक्तींवर थांबविली आहे. आधीच सहा महिन्यांपासून कामबंद, त्यात सुरू झालेले कामही नाममात्र उपस्थितांमध्ये करावे लागत असल्याने लग्नसेवा व्यावसायिकांवर अन्याय होत असल्याची भावना यवतमाळ मंडप डेकोरेशन, लाईट, साऊंड, कॅटर्स व इतर संलग्न व्यावसायिक असोसिएशनचे अध्यक्ष पंकज जयस्वाल व सचिव पवन माहेश्वरी यांनी व्यक्त केली आहे.
उपोषण ठिकाणी घोडे, गॅस शेगडी, कढई, गंज, खुर्च्या, मंडप, लाईट आदी प्रतिकात्मक वस्तूही प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ठेवण्यात आल्या. या आंदोलनात संतोष रावेकर, सुमित केशरवाणी, पवन माहेश्वरी, आकाश केडिया, राजेश राजा, निलेश जाधव, सदस्य दीपक राऊत, सत्यम रोकडे, राजू लाभसेटवार, चेतन नरडवार, प्रवीण रुमाले, शेख रहीम शेख जमाल, राजेश शर्मा, सचिन वानखेडे, किशोर निकोडे, तुषार बारी, अतुल संगीतराव, चंदू कट्यारमल, नरेश उदावंत, प्रशांत रोकडे, मधुकर सुलभेवार, मधू सिंघानिया आदींनी सहभाग घेतला.