शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
5
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
6
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
8
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
9
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
10
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
11
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
12
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
13
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
14
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
15
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
16
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
17
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
18
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
19
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
20
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांनंतर कोरोना रुग्णसंख्या शून्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2022 05:00 IST

दोन वर्षांपूर्वी म्हणजे १ मार्च २०२० रोजी यवतमाळमधील तीन कुटुंबातील दहा सदस्य दुबई दौऱ्यावरून परतले होते. यातीलच एक सदस्य पुणे येथे कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. हा सदस्य बाधित आढळल्यानंतर उर्वरित नऊ सदस्यांना १० मार्च रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विलगीकरण कक्षात दाखल केले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मागील दोन वर्षांपासून जिल्हा कोरोनाच्या संकटाचा सामना करीत आहे. मंगळवारी प्रथमच मार्च २०२० नंतर म्हणजे तब्बल दोन वर्षांनी कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या शून्यावर आली. जिल्ह्यात सद्य:स्थितीत कोरोनाचा एकही सक्रिय रुग्ण नसला तरी कोरोनाची संभाव्य लाट येण्याचे संकेत तज्ज्ञांतून व्यक्त केले जात असल्याने नागरिकांनी प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. दोन वर्षांपूर्वी म्हणजे १ मार्च २०२० रोजी यवतमाळमधील तीन कुटुंबातील दहा सदस्य दुबई दौऱ्यावरून परतले होते. यातीलच एक सदस्य पुणे येथे कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. हा सदस्य बाधित आढळल्यानंतर उर्वरित नऊ सदस्यांना १० मार्च रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विलगीकरण कक्षात दाखल केले होते. त्यांच्या कोरोना तपासणीचा अहवाल नागपूर येथून १४ मार्च रोजी प्राप्त झाला असता या नऊ जणांपैकी दोघेजण कोरोना बाधित असल्याचे पुढे आले होते. त्यानंतर जिल्ह्यात कोरोना बाधितांचा हा आलेख सलग दोन वर्षे कमी-जास्त होत होता. मागील काही दिवसांपासून मात्र कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या मंदावत गेली. त्यातच मागील पाच दिवसांत झालेल्या तपासण्यांपैकी एकाचाही अहवाल पाॅझिटिव्ह आला नाही. दुसरीकडे सक्रिय असलेला रुग्णही बरा होऊन गेल्याने मंगळवारी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या शून्यावर आली.  

एकाच दिवशी झाला होता ४६ जणांचा मृत्यू  - दोन वर्षांत जिल्ह्यात ७९ हजार ६५ जण पाॅझिटिव्ह आढळले होते. विशेष म्हणजे ३ मे २०२१ रोजी एकाच दिवशी सर्वाधिक १३९९ रुग्ण आढळले. तर २६ एप्रिल २०२१ रोजी सर्वाधिक ४६ मृत्यूची नोंद झाली.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या