आत्महत्या करणाऱ्या तरुणीला वाचवल्यानंतरही तिने पुन्हा मारली कालव्यात उडी आणि...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2021 20:22 IST2021-11-17T20:21:56+5:302021-11-17T20:22:58+5:30
यवतमाळ जिल्ह्यातील उमरी येथे जीव देण्यासाठी एका युवतीने कालव्यात उडी घेतल्यानंतर तिला काही युवकांनी वाचवले. मात्र तिने थोड्यावेळाने पुन्हा उडी मारली व जीव दिला.

आत्महत्या करणाऱ्या तरुणीला वाचवल्यानंतरही तिने पुन्हा मारली कालव्यात उडी आणि...
यवतमाळ : तालुक्यातील उमरी येथील मयुरी श्रीधर भोयर (१८) या युवतीने गावाजवळील बेंबळा कालव्यात उडी घेऊन आत्महत्या केली. मयुरीने मंगळवारी दुपारी कालव्यात उडी घेतली होती. त्यावेळी तिला काही युवकांनी पाण्यातून बाहेर काढून घरी पोहोचवून दिले. काही वेळानंतर पुन्हा तिने पाण्यात उडी घेतली. यावेळी मात्र ती पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. बुधवारी तिचा मृतदेह कालव्यात आढळून आला. याप्रकरणी कळंब पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.