अखेर बँकेने पैसे केले परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 21:59 IST2017-08-16T21:56:15+5:302017-08-16T21:59:09+5:30
तालुक्यातील उमरठा येथील वृद्ध कमलाबाईचे घरकुलाचे पैसे कर्जात कपात करणाºयाला जिल्हा परिषद सदस्य निखिल पाटील जैत यांनी धारेवर धरल्याने कमलाबाईला अखेरीस बुधवारी बँकेने पैसे परत केले.

अखेर बँकेने पैसे केले परत
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : तालुक्यातील उमरठा येथील वृद्ध कमलाबाईचे घरकुलाचे पैसे कर्जात कपात करणाºयाला जिल्हा परिषद सदस्य निखिल पाटील जैत यांनी धारेवर धरल्याने कमलाबाईला अखेरीस बुधवारी बँकेने पैसे परत केले. कमलाबाईवर झालेल्या अन्यायाबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर बँकेने तातडीने पाऊले उचलून ही कारवाई केली.
नेर तालुक्यातील उमरठा येथील कमलाबाई किसन मोहड या साठ वर्षिय वृद्धेने गत तिन वर्षांपूर्वी युनियन बँक शाखा शिरजगावकडून ३५ हजारांचे पीककर्ज काढले होते. मात्र सततच्या नापिकीने ती कर्ज भरू शकली नाही. यातच झोपडीत राहणाºया कमलाबाईला घरकूल मंजूर झाले. घरकूलाचा पहिला हप्ता युनियन बँकेत जमा झाला. मात्र हे पैसे युनियन बँकेने कर्ज असल्यामुळे अडकविले. यासाठी कमलाबाई जिल्हा परिषद व पंचायत समितीतही गेली परंतु तिला न्याय मिळाला नाही. यातच घरकूल पूर्ण करण्याची अंतिम मुदतही संपली. ‘लोकमत’ने या बाबीची दखल घेत वृत्त प्रकाशित करताच जिल्हा परिषद सदस्य निखिल पाटील जैत, सामाजिक कार्यकर्ते पिंटू पाटील खोडे यांनी बँक व्यवस्थापकाला धारेवर धरले. शेवटी बँकेने या वृद्ध महिलेला तिचे ३५ हजार रुपये परत दिले. त्यामुळे आता या वृद्धेला हक्काचे घरकूल मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.