तब्बल ४६ वर्षानंतर बालमित्र आले एकत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 06:00 IST2020-03-22T06:00:00+5:302020-03-22T06:00:32+5:30

या काळातील गुरूजनांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक दादा तट्टे, स्टेट बँकेचे निवृत्त अधिकारी नटवरलाल चंदाराणा यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी अनिरूद्ध वेदपाठक व स्मिता वेदपाठक यांनी संगीताची मैफल रंगविली. यावेळी जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला.

After 46 years, the school friends came together | तब्बल ४६ वर्षानंतर बालमित्र आले एकत्र

तब्बल ४६ वर्षानंतर बालमित्र आले एकत्र

ठळक मुद्देसंडे अँकर । कार्यक्रमात गीतांची मैफल रंगली, जुन्या आठवणींना दिला उजाळा

लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : येथील केईएस विद्यालय या सर्वात जुन्या असलेल्या शिक्षण संस्थेत १९६९ ते १९७४ या कालावधीत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनीचा ४६ वर्षानंतर पुनर्भेटीचा मेळावा येथील राहुल भवनात घेण्यात आला.
महाराष्ट्र राज्याच्या माजी शिक्षण संचालक अलका जोशी सराफ, प्रसिद्ध गझलगायक अनिरूद्ध वेदपाठक, डॉ.मिलिंद खाडे, डॉ.मधुबाला शाह, मुंबई रेल्वेचे अधिकारी रतन महिंदर, मोबिन रहेमान, रेखा गादेवार, शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, संतोष चिंतावार, सुनील बोकीलवार, विजय कोंडावार, ज्योती देशमुख यांच्या पुढाकाराने हा मेळावा घेण्यात आला. राजाभाऊ शेकदार यांनी निर्माण केलेल्या केईएस विद्यालयात १९६९-१९७४ या कालावधीत शिक्षण घेतलेल्या परंतु काळाच्या पडद्याआड गेलेल्या विष्णू गाडे, कमलेश चव्हाण, किरण पत्की, विश्वनाथ सोनटक्के, अवधूत वाढई यांना सर्वप्रथम श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर मधुबाला शाह यांनी मित्रांचा परिचय करून दिला.
या काळातील गुरूजनांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक दादा तट्टे, स्टेट बँकेचे निवृत्त अधिकारी नटवरलाल चंदाराणा यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी अनिरूद्ध वेदपाठक व स्मिता वेदपाठक यांनी संगीताची मैफल रंगविली. यावेळी जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात कार्य करणारे तत्कालिन वर्गमित्र निजामुद्दीन अजाणी, राम देवधरे, विकास कोमावार, किरण पाचपोर, रेखा अणे, शैलजा पत्रीवार, ज्योती कळसकर, गजानन मारावार, यशवंत काळे, रतन मोहिंदर, नाना मार्इंदे, प्रतिभा केसकर, चंदनबाला पोद्दार, कृष्णा पुप्पलवार, बरकत जिवाणी, अनिल नार्लावार, भारती बैस, मंजू ढोबळे, अशोक मडगे, केशव मडावी, ज्योती घावडे, विद्यासागर यादगीरवार यांच्यासह शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते.

Web Title: After 46 years, the school friends came together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा