आरटीओचा प्रशासकीय कारभार ढेपाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 23:14 IST2017-09-03T23:14:14+5:302017-09-03T23:14:41+5:30

स्थानिक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) कार्यालयाचे कामकाज पूर्णत: ढेपाळले.

The administrative control of the RTO | आरटीओचा प्रशासकीय कारभार ढेपाळला

आरटीओचा प्रशासकीय कारभार ढेपाळला

ठळक मुद्देअधिकारीच नाही : अप-डाऊन करणाºया कर्मचाºयांची मनमानी, वाहनधारक त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : स्थानिक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) कार्यालयाचे कामकाज पूर्णत: ढेपाळले. कुणी अधिकारीच नसल्याने कर्मचाºयांची मनमानी सुरू असून अप-डाऊन करणाºयांमुळे कोणतेच काम वेळेत होताना दिसत नाही.
जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार मोठा आहे. त्यामुळे येथे नवीन आकृतिबंध तयार करून आरटीओ कार्यालयात नवीन पदनिर्मिती करणे आवश्यक आहे. कित्येक वर्षांपासून येथील पदांची पुनर्रचनाच झाली नसल्याने भ्रष्टाचाराला वाव मिळत असल्याची ओरड सुरू आहे. सध्या मंजूर पदांपैकीच कित्येक पदे रिक्त आहे. त्यामुळे सर्वांचच ‘चांगभलं’ सुरू आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम झोळ आणि सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद देशमुख यांच्या सेवानिवृत्तीनंतर येथे पूर्णवेळ अधिकारीच मिळालेला नाही. त्यामुळे येथील दैनंदिन कामकाज प्रभावीत झाले आहे.
अमरावतीवरून यवतमाळचा प्रशासकीय कारभार हाकणाºया प्रभारी अधिकाºयांची तारेवरची कसरत सुरू आहे. त्याचा लाभ येथील यंत्रणा घेत असून त्याचा फटका सामान्य नागरिकांना तर सोडाच येथे ‘एजन्ट’ म्हणून राबणाºयांनाही बसत आहे. आरटीओतील कोणतेच काम अतिरिक्त पैसे दिल्याशिवाय होत नाही, अशी अनेक वाहनधारकांची ओरड आहे. सरळ मार्गाने एखादी सुशिक्षीत व्यक्ती कोणत्याही कामाचा अर्ज घेऊन गेली, तर त्याला कुणीच उभ करीत नाही. मात्र त्याच व्यक्तीने आरटीओ परिसरात ठाण मांडून असलेल्या एजन्टांची मदत घेतल्यास त्याचे कोणतेच काम अडत नाही, हे विशेष.
कोणत्याही नियमांची आठकाठी येथे येत नाही. सामान्य व्यक्तीला फिटनेससाठी एमबीबीएस डॉक्टरचेच प्रमाणपत्र लागते. मात्र आरटीओच्या ठरलेल्या यंत्रणेकडून गेल्यास अशा प्रमाणपत्राचीही खातरजमा केली जात नाही. केवळ ५० रूपयांत एमबीबीएस डॉक्टरच्या नावे शिक्का मारून प्रमाणपत्र दिले जात असल्याची चर्चा आहे. तेसुद्धा तत्काळ.
असे एक ना अनेक किस्से येथे सुरू आहे. लिपीकवर्गीय यंत्रणाच कार्यालयीन कामकाज सांभाळत असल्याने कोणी किती ‘गल्ला’ जमवायचा, हा त्याच्या क्षमतेचा विषय झाल्याची माहिती आहे. कार्यालयात येण्या-जाण्याचे कर्मचाºयांवर कोणतेही निर्बंध नाही. त्यामुळे कर्मचारी सैरभैर झाले आहेत. वाहनधारकांना मात्र विविध कामांसाठी कार्यालयाच्या येरझारा माराव्या लागत आहे.
आठवडाभर वाहनांचे पासिंग ठप्प
गेल्या २८ आॅगस्टपासून तब्बल आठवडाभर काही कारण नसताना वाहनांचे पासिंग बंद होते. बहुतांश कर्मचारी अमरावतीवरून अप-डाऊन करीत असल्याने प्रत्येक कर्मचारी उशीरा येऊन लवकर घरी परतण्याच्या घाईत असतो. दुपारी १२ वाजताच्या असापास पोहोचलेल्या कर्मचाºयांचा अर्ध्या तासाने लंच टाईम होतो. नंतर तासभर काम चालते न चालते तोच त्यांनी घरी जाण्याचे वेध लागतात.

Web Title: The administrative control of the RTO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.