आदिवासी संघटनांचे प्रशासनाला निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 21:42 IST2017-08-17T21:42:13+5:302017-08-17T21:42:59+5:30
आदिवासी समाजावर होत असलेला अन्याय रोखण्यासाठी संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी यासाठी ......

आदिवासी संघटनांचे प्रशासनाला निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : आदिवासी समाजावर होत असलेला अन्याय रोखण्यासाठी संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना पाठविण्यासाठी जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले. तत्पूर्वी वडगाव येथून रॅली काढण्यात आली. पाच आदिवासी विद्यार्थिनींनी झेंडी दाखवून रॅलीला सुरुवात झाली.
रॅलीचा समारोप येथील तिरंगा चौकात झाला. राजू चांदेकर यांनी प्रास्ताविक केले. पहिली ते चौथीच्या आश्रमशाळा बंद करणे, दीनदयाल उपाध्याय योजना, विद्यार्थ्यांची स्कॉलरशीप आदी निर्णय आदिवासींचे अस्तित्व संपविणारे आहे. बोगस जात वैधता प्रमाणपत्र व बोगस जात प्रमाणपत्राच्या आधारे अनेकांनी नोकºया लाटल्या. यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी केली जात नाही. यासाठी आदिवासी संघटनांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
शैलेश गाडेकर यांनी कोलाम समाजाची परिस्थिती मांडली. अध्यक्षीय भाषणात विठोबाजी मसराम यांनी समाजाचे प्रश्न मांडले. राजू चांदेकर, किशोर उईके, बंडू मेश्राम, शैलेश गाडेकर, निनाद सुरपाम, डॉ. विवेक चौधरी, नरेश गेडाम यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहू, असे यावेळी सांगितले. गजानन किनाके व संगीता किनाके यांनी सादर केलेल्या बिरसा गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी एम.के. कोडापे, देवेंद्र चांदेकर, दशरथ मडावी, माधव सरकुंडे, पवन आत्राम, अविनाश मसराम, बंडू मसराम, डॉ. अरविंद कुडमेथे, प्रफुल्ल आडे, राजू केराम, राजेंद्र नराधन, सचिन सचाने, किरण कुमरे, सुनील ढाले, प्रल्हाद सिडाम, शेखर मदनकर, दिलीप मडावी, दिलीप उईके, श्रीकांत किनाके, दिलीप कुडमथे, प्रमोद घोडाम, बाळू वेट्टी, राहुल कुमरे, शैलेश मडावी, बाळकृष्ण गेडाम, दौलतराव किनाके, भगवान कोवे, प्रल्हादराव उईके, सागर वेट्टी, सुरेखा कुडमथे, मंदा मडावी, संगीता किनाके, रेखा कनाके, विद्या बोरकर, मंदा मडावी, वैष्णवी धुर्वे, पूजा मडावी आदी उपस्थित होते.