शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
4
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
5
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
6
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
7
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
8
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
9
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
10
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
11
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
12
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
13
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
14
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
15
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
16
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
17
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
18
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
19
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
20
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
Daily Top 2Weekly Top 5

पीक विम्यातून कर्ज कपात केल्यास बँकांवर कारवाई

By admin | Updated: June 4, 2016 02:13 IST

शासनाच्या निर्णयानुसार जिल्ह्यातील सर्व गावांची खरीप हंगाम पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आली आहे.

जिल्हाधिकारी : पीक कर्ज वाटपाची आढावा बैठकयवतमाळ : शासनाच्या निर्णयानुसार जिल्ह्यातील सर्व गावांची खरीप हंगाम पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आली आहे. त्यामुळे राज्य शासनातर्फे शेतकऱ्यांचे कर्ज पुनर्गठण करण्यात येत आहे. पुनर्गठण करताना शेतकऱ्यांवर कोणताही बोजा पडू नये, तसेच पिकविम्याच्या अनुदानातून कर्ज वसुली केल्यास बँकांवर कारवाई करण्यात येईल, असे आदेश जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीयकृत बँकांकडून पीक कर्ज वाटपाची आढावा बैठक झाली. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी हे निर्देश दिले. यावेळी जिल्हा उपनिबंधक अर्चना माळवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गायकवाड, राष्ट्रीयकृत बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.जिल्हाधिकारी सिंह यावेळी म्हणाले, पैसेवारी कमी आल्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी २०१५-१६ मध्ये खरीप हंगामासाठी पीक कर्ज घेतले आहे, त्यांना पुनर्गठणाचा लाभ देण्यात येणार आहे. पुनर्गठण करताना शेतकऱ्यांवर स्टॅम्प ड्युटी किंवा इतर खर्च पडू नये, याची बँकांनी काळजी घ्यावी. हवामान आधारित विमा योजनेतून मिळणाऱ्या रक्कमेतून बँकांना कर्ज वसुली करता येते. मात्र येत्या आठ दिवसात पीकविमा अनुदानाच्या रक्कमेतून बँकांना वसुली करता येणार नाही. हा पैसा शेतकऱ्यांना पेरणीपूर्व किंवा बियाणे खरेदीसाठी उपयोगात आणता येणार आहे. साधारणत: जिल्ह्यात ११७ कोटी रूपयांची मदत या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे बँकांनी हे अनुदान कर्जातून कपात करू नये. अशा प्रकारच्या तक्रारी आल्यास बँकांवर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांच्या प्रतिनिधींना यावेळी दिले.जिल्ह्यात एकूण चार लाख १७ हजार शेतकरी आहेत. यापैकी ६८ टक्के शेतकरी पुन्हा कर्ज घेण्यास पात्र आहेत. प्रत्येक शेतकऱ्याला कर्ज देण्याचे धोरण शासनाने आखले आहे. त्यामुळे जिल्ह्यात ४० हजार नव्या शेतकऱ्यांना कर्ज दिल्यास सुमारे ८० टक्के शेतकरी कर्जाखाली येण्यास मदत होईल. कर्ज वाटपास बँकांना अद्यापही बराच कालावधी हाती आहे. त्यामुळे हे लक्ष्य पूर्ण होऊ शकेल. त्यामुळे पीक कर्ज वाटपात जिल्ह्याचे एक चांगले उदाहरण निर्माण होऊ शकेल. यावर्षी पीकविमा दावे बँकांनी तातडीने संबंधित विमा कंपनीला पाठवावेत. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत आणि विम्याची रक्कम मिळण्यास मदत मिळेल. तसेच यावर्षी पंतप्रधान पीकविमा योजना येणार आहे. यासाठी एका पिकांसाठी विम्याचा दर एक समान राहणार आहे. याचाही अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यावर्षी पीक कर्ज आणि इतर बाबी महिनाभर आधी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल. यासाठी सर्व बँकांनी प्रयत्नशील राहावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले. (स्थानिक प्रतिनिधी)