कौटुंबिक ग्रुपवर अश्लील व्हिडिओ टाकणार्या आरोपीला हैदराबाद येथून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2022 16:00 IST2022-03-09T15:58:36+5:302022-03-09T16:00:02+5:30
मुकुंद माहेश्वरी (वय ४७), असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

कौटुंबिक ग्रुपवर अश्लील व्हिडिओ टाकणार्या आरोपीला हैदराबाद येथून अटक
यवतमाळ- कौटुंबिक ग्रुपवर अश्लील व्हिडिओ टाकणार्या आरोपीला अवधूतवाडी पोलिसांनी अखेर हैदराबाद येथून अटक केली. त्याला न्यायालयापुढे हजर केले असता, तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
मुकुंद माहेश्वरी (वय ४७), असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. यवतमाळात त्याचे नातेवाइक वास्तव्यास असून त्याने कौटुंबिक ग्रुपवर अश्लील व्हिडीओ टाकले होते. त्या ग्रुपवर नात्यातील महिला, तरूणीदेखील होत्या. मुकुंद याने स्वत:ची पत्नी आणि मुलीबद्दलही आक्षेपार्ह विधान केले होते. या घटनेची तक्रार त्रस्त झालेल्या महिला नातेवाइकांनी अवधूतवाडी पोलिस ठाण्यात केली होती. त्यावरून गुन्हाही नोंदविण्यात आला होता.
जवळपास सहा महिन्यापासून आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर पोलिसांनी हैदराबाद गाठून अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.