शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत खाते वाटप झाले, समितीसाठी मतदान

By admin | Updated: November 8, 2014 01:44 IST

जिल्हा परिषदेत विषय समित्यांचे खाते वाटप आणि समितीच्या रिक्त जागेवर सदस्यांची नियुक्ती यासाठी आज सर्वसाधारण सभा घेण्यात आली.

यवतमाळ : जिल्हा परिषदेत विषय समित्यांचे खाते वाटप आणि समितीच्या रिक्त जागेवर सदस्यांची नियुक्ती यासाठी आज सर्वसाधारण सभा घेण्यात आली. ही निवड प्रक्रिया पूर्ण करण्याअगोदर सभेत मागील इतिवृत्तावर चर्चा झाली. यामध्ये बीडीओंची सभेला असलेली गैरहजेरी हा मुद्दा सर्वच सदस्यांनी उचलून धरला. सत्ताधारी आणि विरोधकांनी सभेला बीडीओंना उपस्थित राहणे बंधनकारक करा, अशी एकमुखी मागणी केली. इतिवृत्ताच्या चर्चेत बऱ्याच मुद्यांवरून विरोधकांप्रमाणेच सत्ताधारी सदस्यांनीही अधिकाऱ्यांना धारेवर धरले. नेहमी प्रमाणे वेळ मारून नेण्याचा प्रकार याही वेळेस पहायला मिळाला. समिती सदस्य निवडीची प्रक्रिया पूर्ण करण्याऐवजी सभेत इतिवृत्ताचीच चर्चा अधिक काळ चालत असल्याबाबत देवानंद पवार यांंनी आक्षेप घेतला. यावेळी शिवसेना व भाजपा सदस्यांनी त्यांच्या भूमिकेचे समर्थन केले तर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सदस्यांकडून याचे खंडण करण्यात आले. ही सभा ४ वाजेपर्यंत चालली. सभेदरम्यानच माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख, उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, सभापती नरेंद्र ठाकरे यांच्यात चर्चा सुरू होती. सभागृहाबाहेर येऊन या नेत्यांनी कोणते खाते कुणाला जाणार याबाबत वाटाघाटी केल्या. स्थायी समितीवर मिनाक्षी विलास राऊत यांनी आपला दावा केला. यावरून काँग्रेसच्याच दोन नेत्यात नाराजी नाट्यही रंगले. नंतर फोनवरून आलेल्या पक्षश्रेष्ठींच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी बाळासाहेब मांगुळकर यांच्यावर ठेऊन ठेपली. त्यांनी विलास राऊत यांची समजूत काढत ऐनवेळी राष्ट्रवादीला जागा सोडण्यास भाग पाडले. यानंतर लगेच खातेवाटप करण्यात आले. यामध्ये शिक्षण व आरोग्य हे महत्वपूर्ण खाते उपाध्यक्षांना देण्याऐवजी सभापती नरेंद्र ठाकरे यांच्याकडे सोपविण्यात आले. उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर यांच्याकडे कृषी व पशुसंवर्धन, सुभाष ठोकळ यांच्याकडे अर्थ व बांधकाम पूर्ववत कायम ठेवण्यात आले. (कार्यालय प्रतिनिधी)