पैनगंगा नदीवर अपघात, दोन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 15:01 IST2017-11-01T15:00:36+5:302017-11-01T15:01:26+5:30
हदगाव उमरखेड रोडवर बुधवारी सकाळी ६ च्या सुमारास दोन ट्रक्सचा अपघात होऊन दोन जण ठार झाल्याची घटना घडली.

पैनगंगा नदीवर अपघात, दोन ठार
ठळक मुद्देवाद आॅटोचालक दुधविक्रेत्याचा
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ:
सकाळच्या वेळेस एक आॅटोचालक व एका दुधवाल्यात गाडी भाड्यावरून भांडण होत असताना उभ्या असलेल्या एका ट्रकवर दुसरा ट्रक जाऊन आदळला. या धडकेत दोन जण ठार झाले तर एकजण जखमी झाला. यात चालक समीर खान, रा. सुदर्शननगर (२२) व कुणाल कैलास कांबळे, रा. वरूड, जि. यवतमाळ (२५) ठार झाले तर विठ्ठल शामराव दोडके (२५) रा. सुदर्शननगर हे जखमी झाले आहेत. हदगाव पोलिसांनी येऊन वाहतूक सुरळीत केली.