मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या इसमाचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 05:00 IST2020-02-10T05:00:00+5:302020-02-10T05:00:29+5:30

घटना रविवारी पहाटे ६ वाजता एका ढाब्याजवळ घडली. रवींद्र आनंदराव पिसे (५४) असे मृताचे नाव आहे. मूळचे जवळा ता.आर्णी येथील रवींद्र पिसे महागाव येथे वास्तव्यास होते. नेहमीप्रमाणे रविवारी पहाटे ते मॉर्निंग वॉकसाठी नदीच्या दिशेने निघाले होते. त्यांना मागून अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले.

Accidental death of Ismaa going to Morning Walk | मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या इसमाचा अपघाती मृत्यू

मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या इसमाचा अपघाती मृत्यू

ठळक मुद्देमहागावची घटना : मृत मूळचा आर्णीतील

लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव : मॉर्निंग वाकला जाण्यासाठी निघालेल्या इसमाला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना पुसद येथे नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी पहाटे ६ वाजता एका ढाब्याजवळ घडली.
रवींद्र आनंदराव पिसे (५४) असे मृताचे नाव आहे. मूळचे जवळा ता.आर्णी येथील रवींद्र पिसे महागाव येथे वास्तव्यास होते. नेहमीप्रमाणे रविवारी पहाटे ते मॉर्निंग वॉकसाठी नदीच्या दिशेने निघाले होते. त्यांना मागून अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले. नंदकुमार कावळे यांनी त्यांना सवना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. नंतर त्यांना पुसद येथील एका खासगी रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. ते येथील एका गॅस एजन्सीमध्ये गॅस डिलिव्हरीचे काम करीत होते. प्रकरणी महागाव पोलिसानी अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल केला.
आर्णी तालुक्यातील जवळा येथून रोजगाराच्या शोधात महागाव येथे आले होते. त्यांची पत्नी येथील गोपिकाबाई भरवाडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मदतनिस म्हणून आपल्या परिवाराला हातभार लावत होती. रवींद्र पिसे प्रामाणिकपणे कार्य करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांचा मृत्यू झाल्याने पिसे परिवारच उघड्यावर आला आहे.

Web Title: Accidental death of Ismaa going to Morning Walk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात