यवतमाळ जिल्ह्यात अपघात; दोन ठार, तीन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 12:27 IST2019-08-30T11:43:45+5:302019-08-30T12:27:30+5:30
वणी यवतमाळ मार्गावर असलेल्य विनायक कोटेक्स जिनिंगजवळ शुक्रवारी सकाळी ९.१५ च्या सुमारास झालेल्या अपघातात दोन ठार तर तीन जण जखमी झाले आहेत.

यवतमाळ जिल्ह्यात अपघात; दोन ठार, तीन जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: वणी यवतमाळ मार्गावर असलेल्य विनायक कोटेक्स जिनिंगजवळ शुक्रवारी सकाळी ९.१५ च्या सुमारास झालेल्या अपघातात दोन ठार तर तीन जण जखमी झाले आहेत.
मोटरसायकल व ऑटो यांच्यात समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. रस्त्यावरील गाय आडवी आल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येते. जखमींवर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मृतांमध्ये, तुळशीराम भीमा टेकाम ( ४५) व संतोष नारायण मडावी (38) दोघेही राहणार आवळगाव ता मारेगाव
तर जखमींमध्ये मारोती मसुजी शिंदे (४०) चालक, अतुल रामदास मेश्राम (३९), सुनील भीमा तोटे (३०), सुधाकर सूर्यभान वाघाडे
सर्व राहणार बोटोनी ता. मारेगाव, निळकंठ अय्या टेकाम रा. शिवणाला ता मारेगाव यांचा समावेश आहे.