यवतमाळ- यवतमाळ येथील दारव्हा मार्गावर भरधाव कार झाडावर आदळून जिल्हा परिषदच्या माजी बांधकाम सभापती चा मृत्यू झाला. ही घटना तिवसा गावाजवळ रविवारी रात्री घडली. सुभाष मधुकर ठोकळ रा चाणी कामठवाडा असे मृताचे नाव आहे. ते कारने यवतमाळ येथून गावी चानी कडे जाताना हा अपघात झाला. त्यांना गँभिर अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच यवतमाळ चे आमदार मदन येरावार यांच्यासह अनेक नेते मंडळींनी रुग्णालयात धाव घेतली.
Accident: भीषण कार अपघातात जिल्हा परिषदेच्या माजी सभापतींचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 05:05 IST