यवतमाळ जिल्ह्यात माहूरच्या देवीला जाणारा मिनीडोअर उलटून दहा जखमी; दोन गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 16:18 IST2018-01-12T16:17:46+5:302018-01-12T16:18:17+5:30

यवतमाळ जिल्ह्यात माहूरच्या देवीला जाणारा मिनीडोअर उलटून दहा जखमी; दोन गंभीर
ठळक मुद्देसर्व प्रवासी १२ ते २० या वयोगटातले
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: माहूरगडच्या रेणुकामातेच्या दर्शनाला निघालेल्या मिनीडोअरला अपघात होऊन दहाजण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी २.३०च्या सुमारास घडली. आर्णी- माहूर मार्गावर असलेल्या कोसदरी घाटात हा मिनीडोअर अचानक अनियंत्रित होऊन उलटला. यात असलेल्या भाविकांपैकी १० जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. हे प्रवासी दारव्ह्याच्या म्हातोलीचे रहिवासी असून ते १२ ते २० या वयोगटातील आहेत.