अभाविपने मुख्यमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 21:54 IST2017-12-11T21:53:42+5:302017-12-11T21:54:05+5:30
महाविद्यालयांमधील छात्रसंघाच्या निवडणुकांबाबत शिक्षण मंत्री चालढकल करीत आहे. त्याच्या निषेधार्थ सोमवारी सायंकाळी अभाविपच्या विद्यार्थी कार्यकर्त्यांनी शिक्षणमंत्र्यांसह, मुख्यमंत्री, सामाजिक न्यायमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.

अभाविपने मुख्यमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : महाविद्यालयांमधील छात्रसंघाच्या निवडणुकांबाबत शिक्षण मंत्री चालढकल करीत आहे. त्याच्या निषेधार्थ सोमवारी सायंकाळी अभाविपच्या विद्यार्थी कार्यकर्त्यांनी शिक्षणमंत्र्यांसह, मुख्यमंत्री, सामाजिक न्यायमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.
दाते कॉलेज चौकात झालेल्या या आंदोलनावेळी विद्यार्थ्यांनी तीनही मंत्र्याविरुद्ध प्रचंड नारे दिले. नवीन विद्यापीठ कायद्यानुसार छात्रसंघाच्या निवडणुका खुल्या पद्धतीने घेणे आवश्यक आहे. पण गेल्या दोन वर्षापासून महाराष्ट्रात छात्रसंघ निवडणुका बंदच आहे. लोकशाही पद्धतीने निवडणुका न घेता छात्रसंघ सिलेक्शन पद्धतीने घेण्याचा सरकारचा डाव आहे. याबाबतचे विधेयकही सरकारने आणले आहे. याबाबीचा अभाविपने तीव्र निषेध केला. यानंतर राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या विरोधात नारे लावून त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. प्रलंबित शिष्यवृत्ती, सेमिस्टर पॅटर्न, खुल्या छात्रसंघ निवडणुका यासंदर्भात विद्यार्थ्यांनी मते मांडली.
यावेळी अभाविपचे नगर सहमंत्री युवराज आगळे, कौस्तुभ मोहदरकर, गौरव जगताप, धिरज शिंदे, पियुष पंचबुद्धे, ऐश्वर्या बैस, प्रांजली दंडे, मंजुषा खर्चे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.