शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंविरुद्ध पुसद न्यायालयाचं वॉरंट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 15:21 IST2019-04-23T15:08:56+5:302019-04-23T15:21:26+5:30

दै. सामनाचे संपादक तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत आणि मुद्रक व प्रकाशक राजेंद्र भागवत यांच्याविरुद्ध पुसद येथे प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी अनंत बाजड यांनी सोमवारी वॉरंट बजावलं. 

abusive words used against maratha kranti morcha, warrant against Uddhav Thackeray | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंविरुद्ध पुसद न्यायालयाचं वॉरंट 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंविरुद्ध पुसद न्यायालयाचं वॉरंट 

यवतमाळ - दै. सामनाचे संपादक तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत आणि मुद्रक व प्रकाशक राजेंद्र भागवत यांच्याविरुद्ध पुसद येथे प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी अनंत बाजड यांनी सोमवारी वॉरंट बजावलं. 

राज्यभरातील मराठा क्रांती मोर्चा संदर्भात दै. सामनामधून व्यंगचित्राद्वारे ‘मुका मोर्चा’ असे संबोधून संपूर्ण मराठा समाजाची खिल्ली उडवून अपमान केल्याची तक्रार पुसदचे अ‍ॅड. दत्ता सूर्यवंशी यांनी दाखल केली होती. २२ एप्रिल रोजी या तिघांनाही न्यायालयात हजर होण्याचे समन्स बजावण्यात आले होते. मात्र ते न्यायालयासमोर उपस्थित न झाल्याने न्या. बाजड यांनी सोमवारी या तिघांविरुद्ध वॉरंट बजावले. व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभूदेसाई हे सध्या सामनामध्ये नाहीत. त्यांना समन्स बजावण्यात आला आहे.

Web Title: abusive words used against maratha kranti morcha, warrant against Uddhav Thackeray