शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 06:22 IST

पीडितेच्या तक्रारीवरून सासू, सासूचा दुसरा नवरा, दीर, नणंद, नंदई, यांच्याविरोधात आर्णी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

आर्णी (जि. यवतमाळ) : पती व एका मुलाच्या अकस्मात निधनामुळे निराधार झालेल्या महिलेच्या अवस्थेचा गैरफायदा घेऊन सासरच्या मंडळींनी तिला मध्य प्रदेशात नणंदेकडे ठेवले. तेथून त्या महिलेची एक लाख २० हजारात गुजरात येथील एका व्यक्तीला विक्री करण्यात आली. त्या व्यक्तीने पीडित महिलेसोबत करार केला. तुझ्यापासून मला एक मूल हवयं, त्यानंतर तुला गावी सोडतो, असे सांगितले. तब्बल दोन वर्ष महिला गुजरातमध्ये राहिली. मुलगा झाल्यानंतर ती गावी परतली. हा धक्कादायक प्रकार आर्णी पोलिसांच्या बेपत्ता शोध मोहिमेतून उघड झाला.

४२ वर्षीय महिला पती व मुलाच्या मृत्यूने विमनस्क झाली होती. तिचा एक मुलगा व एक मुलगी या दोघांना महिलेच्या नंणदेने मध्य प्रदेशात नेले. महिलेच्या माहेरची स्थिती बेताची असल्याने ती सासरीच राहत होती. 

सासरच्या मंडळींनी रचला कट, बदल्यात घेतले पैसे सासरच्या मंडळींनी या विधवा महिलेला विकण्याचा कट रचला होता. २०२३ मध्ये महिलेची नणंद व नंदई या दोघांनी त्या महिलेला सुरेश पोपटभाई चौसाने (४८) रा. हिरापूर ता. शंकर जि. मोरबी गुजरात याला विकले. त्या बदल्यात १ लाख २० हजार रुपये त्याच्याकडून घेतले. या व्यवहारानंतर पीडित महिला सुरेश पोपट याच्यासोबत दोन वर्ष राहिली. सुरेश पासून तिला एक मुलगा झाला. प्रसूतीनंतर सुरेशने काही दिवसापूर्वी त्या महिलेला आर्णी तालुक्यातील तिच्या माहेरी आणून सोडले.

दरम्यान आर्णी पोलिस बेपत्ता महिलेचा शोध घेत असताना त्यांना ही महिला गावीच असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी महिलेकडे चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार पुढे आला.

सासू सासरे यांच्याविरोधात गुन्हापीडितेच्या तक्रारीवरून सासू, सासूचा दुसरा नवरा, दीर, नणंद, नंदई, यांच्याविरोधात आर्णी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या माता-पित्यांनी दिली होती. मात्र ती २ वर्षांनी परतली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीYavatmalयवतमाळMaharashtraमहाराष्ट्र