लिफ्ट मिळताच दुचाकीस्वाराच्या गळ्याला लावला चाकू; वाई मेंढी येथील घटना : राेख, माेबाइल अन् दुचाकी घेऊन पसार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 16:58 IST2025-08-24T16:57:49+5:302025-08-24T16:58:48+5:30
दुचाकीने गावी परत जाणाऱ्या युवकाला अज्ञात दाेघांनी रात्री लिफ्ट मागितली. नंतर काही अंतरावर नेऊन त्यालाच बेदम मारहाण करत त्याच्या जवळची राेख रक्कम, माेबाइल व दुचाकी हिसकावून पसार झाले.

लिफ्ट मिळताच दुचाकीस्वाराच्या गळ्याला लावला चाकू; वाई मेंढी येथील घटना : राेख, माेबाइल अन् दुचाकी घेऊन पसार
सुरेंद्र राऊत/यवतमाळ
दिग्रस (यवतमाळ) : दुचाकीने गावी परत जाणाऱ्या युवकाला अज्ञात दाेघांनी रात्री लिफ्ट मागितली. नंतर काही अंतरावर नेऊन त्यालाच बेदम मारहाण करत त्याच्या जवळची राेख रक्कम, माेबाइल व दुचाकी हिसकावून पसार झाले. ही घटना तालुक्यातील वाईमेंढी मार्गावर मंगळवार, दि. १९ ऑगस्टच्या रात्री घडली. दिग्रस पाेलिसांनी अज्ञता दाेघांविराेधात दि. २३ ऑगस्ट राेजी गुन्हा दाखल केला.
प्रवीण रामचंद्र वांझाड (रा. तुपटाकळी) हा युवक एमएच २९ सीडी १२११ क्रमांकाच्या दुचाकीने गावाकडे जात हाेता. त्याला रस्त्याच्या कडेवर दाेघेजण पायदळ जाताना दिसले. त्यांनी हात दाखवून मदत मागितली. प्रवीण सुद्धा मदतीसाठी थांबला. त्या दाेघांनी पुढच्या गावात जायचे असे सांगितले. लगेच प्रवीण याने त्यांना दुचाकीवर बसविले, मात्र काही अंतर जात नाही ताेच त्यातील एकाने प्रवीच्या गळ्याला चाकू लावला. थापड बुक्क्यांनी मारहाण सुरू केली.
प्रवीणची दुचाकी थांबवून त्याच्या खिशातील राेख ११ हजार, माेबाइल आणि दुचाकी घेऊन तिघेही पासर झाले. अज्ञातांना लिफ्ट देणे प्रवीण वांझाड याला महागात पडले. दिग्रस पाेलिस या गुन्ह्यातील आराेपींचा शाेध घेत आहेत.