धक्कादायक: गतिरोधकावरून उसळून दुचाकीस्वाराचा मृत्यू
By विलास गावंडे | Updated: December 22, 2023 19:20 IST2023-12-22T19:19:28+5:302023-12-22T19:20:22+5:30
नेर येथून यवतमाळकडे जात होते.

धक्कादायक: गतिरोधकावरून उसळून दुचाकीस्वाराचा मृत्यू
विलास गावंडे, नेर (यवतमाळ) : गतिरोधकावरून दुचाकी उसळून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी यवतमाळ मार्गावरील सोनवाढोणा गावाजवळ घडली. गणेश वसंत केवटे (५०) रा.नेर. असे मृताचे नाव आहे.
गणेश केवटे हे नेर येथून यवतमाळकडे जात होते. सोनवाढोणा गावाजवळील गतिरोधकावरुन उसळून ते खाली पडले. यात गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारार्थ नागपूर येथे हलविण्यात आले. रात्री ९ वाजताच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. गणेश केवटे यांचा सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग होता. येडा समाजसेवक म्हणून त्यांना ओळखले जायचे. तालुक्यातील सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी विविध प्रकारची आंदोलने केली. शुक्रवारी त्यांच्या पार्थिवावर नेर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ प्रशांत केवटे व मोठा आप्त परिवार आहे.