शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

शस्त्र परवान्याचीही फॅशन जिल्ह्यात 894 परवाने !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 05:00 IST

शस्त्रास्त्र परवाने मिळविणे अवघड आहे. त्याच पद्धतीने त्याचे संरक्षण करणेही तितकेच अवघड आहे. ही शस्त्रे बाळगताना शेती संरक्षणासाठी १२ बोअर बंदुकीला परवाना आहे. तर स्वसंरक्षणासाठी रिव्हाॅल्व्हर आणि पिस्टल अशा दोन बंदुकींना परवाने देण्यात येतात. हे शस्त्र सार्वजनिक ठिकाणी काढता येत नाही. केवळ आत्मसंरक्षणासाठी त्याचा शेवटचा पर्याय म्हणून या शस्त्राचा वापर करता येतो. 

ठळक मुद्देपाच वर्षांपासून परवाने देण्याचे प्रमाण घटलेयवतमाळ आणि पुसदमध्ये सर्वाधिक परवाने

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : स्वसंरक्षण आणि शेतीसंरक्षण या दोन प्रमुख कारणांसाठी शस्त्रास्त्र परवाने देण्यात येतात. यामध्ये शेत शिवारात जंगली श्वापदांपासून वाचण्यासाठी सर्वाधिक परवाने काढण्यात आले आहे. जिल्ह्यामध्ये ८९४ परवाने नागरिकांनी काढले आहे. यामध्ये लोकप्रतिनिधी, व्यापारी, ठेकेदार आणि सर्वाधिक डाॅक्टरांचा समावेश आहे. याशिवाय प्रतिष्ठित व्यक्ती आणि काही शेतकऱ्यांचाही समावेश आहे. शस्त्रास्त्र परवाने मिळविणे अवघड आहे. त्याच पद्धतीने त्याचे संरक्षण करणेही तितकेच अवघड आहे. ही शस्त्रे बाळगताना शेती संरक्षणासाठी १२ बोअर बंदुकीला परवाना आहे. तर स्वसंरक्षणासाठी रिव्हाॅल्व्हर आणि पिस्टल अशा दोन बंदुकींना परवाने देण्यात येतात. हे शस्त्र सार्वजनिक ठिकाणी काढता येत नाही. केवळ आत्मसंरक्षणासाठी त्याचा शेवटचा पर्याय म्हणून या शस्त्राचा वापर करता येतो. पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालानंतरच छाननी करून शस्त्रांचे परवाने देण्याबाबत जिल्हाधिकारी निर्णय घेतात. ज्या शस्त्राला परवाना मिळाला आहे ते हरविता येत नाही. याशिवाय त्याचा दहशत पसरविण्यासाठी उपयोगही करता येत नाही. त्यामुळे अशा शस्त्रास्त्रांना जपून वापरावे लागते. गत पाच वर्षात अनेक अर्ज आले. मात्र प्रशासनाने सर्व बाबींची शहानिशा केल्यानंतर यातील बहुतांश अर्ज नाकारले आहे. स्वसंरक्षण आणि शेतीसंरक्षण यासाठी या शस्त्रांना परवानगी आहे. 

शस्त्र परवाना   काढायचा कसा?परवाना काढताना जिल्हाधिकारी कार्यालयात त्यासंदर्भातील ठोस असे कारण द्यावे लागते. त्यानंतर शस्त्रास्त्र का आवश्यक आहे यावर सुनावणी होते. त्यानंतर विचार करून परवाना दिला जातो.

अधिकारी वर्गातही वाढती क्रेझशस्त्र परवाना मिळविण्यासाठी आता महसुलातील अधिकारीही धडपडत आहे. रेती माफियांच्या उपद्रवामुळे दंडाधिकाऱ्यांचा दर्जा असलेले अधिकारी स्वत:ला असुरक्षित समजत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडे शस्त्र परवान्यासाठी अर्ज येत आहे. 

पाच वर्षांत मोजकेच परवानेपरवाना मागण्याचा अधिकार काही निवडक प्रकरणातच देण्यात आला आहे. या अर्जानंतर संबंधित व्यक्तीला परवाना द्यायचा की नाही या विषयाचे अधिकार जिल्हा प्रशासनाला आहे. जिल्ह्यामध्ये त्याअनुषंगाने सुनावण्या झाल्या. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी शस्त्रास्त्रांचे परवाने नाकारले आहे. यामुळे पाच वर्षात मोजक्याच परवान्यांना परवागी मिळाली आहे. 

कठोर नियमांमुळे नवीन परवाने थांबले- जीवाला धोका असणाऱ्या व्यक्तींना शस्त्रास्त्र बाळगण्याचे परवाने देताना प्रथमत त्यांच्यावर खरच हल्ला झाला होता का, याचा अहवाल घेतला जातो.- यानंतर पोलीस विभागाकडून त्या प्रकरणात सुनावणी केली जाते. या सर्व बाबी तपासल्यानंतर जिल्हाधिकारी शस्त्रास्त्राचे परवाने दिले जातात. 

 

टॅग्स :Policeपोलिस