पांढरकवडा उपविभागात ८२ टक्के पेरणी

By Admin | Updated: June 29, 2017 00:19 IST2017-06-29T00:19:57+5:302017-06-29T00:19:57+5:30

पांढरकवडा कृषी उपविभागातील पांढरकवडा, मारेगाव, वणी व झरी तालुक्यात आत्तापर्यंत ८२ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे.

82% sowing in the subdivision subdivision | पांढरकवडा उपविभागात ८२ टक्के पेरणी

पांढरकवडा उपविभागात ८२ टक्के पेरणी

दुबार पेरणीचे संकट : २५ टक्के बियाणे उगवलेच नाही, शेतकरी चिंतेत
नरेश मानकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : पांढरकवडा कृषी उपविभागातील पांढरकवडा, मारेगाव, वणी व झरी तालुक्यात आत्तापर्यंत ८२ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. परंतु यापैकी जवळपास २५ टक्के पेरणी उलटली असून काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट येऊन उभे ठाकले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
कृषी उपविभागातील चारही तालुक्यात दोन लाख ८६९ हेक्टर जमिन लागवडी योग्य आहे. यापैकी आत्तापर्यंत एक लाख ६४ हजार ७३७ हेक्टर जमिनीवर पेरणी करण्यात आली आहे. पांढरकवडा उपविभागात दोन लाख ८६९ हेक्टर क्षेत्रापैकी केवळ एक लाख ६४ हजार ७३७ हेक्टर जमिनीवर पेरणी आटोपली आहे. यापैकी एक लाख १९ हजार ७६ हेक्टर क्षेत्रात कपासी या नगदी पिकाची लागवड करण्यात आली. २४ हजार ७१० हेक्टरवर तूर, १९ हजार ४२० हेक्टरवर सोयाबीनची, तर ७४७ हेक्टर जमिनीवर ज्वारीची लागवड करण्यात आली. तालुक्यात आत्तापर्यंत ८३ टक्के पेरणी आटोपली आहे. ५३ हजार १४७ हेक्टर पैकी ४४ हजार २९३ हेक्टर क्षेत्रात पेरणी आटोपली असून सर्वाधिक ३१ हजार ४५० हेक्टर जमिनीवर कपासीची लागवड करण्यात आली आहे. चार हजार ६९० हेक्टर जमिनीवर सोयाबीनची पेरणी करण्यात आली असून सात हजार ३४० हेक्टरवर तूरीची पेरणी करण्यात आली आहे. वणी तालुक्यातसुध्दा ८३ टक्के पेरणी आटोपली असून ६० हजार २९५ हेक्टरपैकी ५० हजार ११५ हेक्टरमध्ये पेरणी करण्यात आली. ४२ हजार ३२० हेक्टरवर कपासी, चार हजार ९०० हेक्टरवर तूर तर केवळ २५३० हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली. मारेगाव तालुक्यात सर्वात कमी म्हणजे ७० टक्के पेरणी पुर्ण झाली असून ४५ हजार १८९ हेक्टरपैकी ३१ हजार ७९३ हेक्टर जमिनीवर पेरणी करण्यात आली आहे. यामध्ये २२ हजार ५४० हेक्टरवर कपासी, चार हजार ८२० हेक्टरवर तूर, तर चार हजार २०० हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. झरी तालुक्यात सर्वात जास्त म्हणजे ९१ टके पेरणी आटोपली असून ४२ हजार २३८ हेक्टर पैकी ३८ हजार ५३६ हेक्टरवर ही पेरणी पुर्ण झाली आहे. २२ हजार ७६६ हेक्टरवर कपाशी,८ हजार हेक्टरवर सोयाबीन व ७ हजार ६५० हेक्टरवर तूरीची लागवड करण्यात आली.
गेल्या तीन चार वर्षापासून सतत दुष्काळ पडत असतांना यावर्षी पावसाचे प्रमाण समाधानकारक असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्यामुळे शेतकरी नव्या उमेदीने आपल्या शेतीच्या पेरणीसाठी कामाला लागला होता. मोठ्या आशेने कर्ज काढून, उधारवाडीने बी बीयाने खरेदी केले. परंतु पाहिजे तसा सार्वत्रिक पाऊस न झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशेवरच पाणी फेरल्या गेले.

समाधानकारक पावसामुळे आटोपल्या पेरण्या
यावर्षी सुरुवातीपासूनच समाधानकारक पाऊस झाल्यामुळे उपविभागातील पांढरकवडा, मारेगाव, वणी व झरी या चारही तालुक्यात ८२ टक्के पेरण्या पुर्ण झाल्या आहेत. पावसाअभावी उपविभातील पेरण्या कांही प्रमाणात खोळंबल्या असल्या तरी आता पाऊस बऱ्यापैकी झाल्यामुळे राहिलेली पेरणी येत्या चार दिवसात पुर्ण होईल, अशी अपेक्षा उपभिागीय कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केली. यावर्षी कपासीच्या पेऱ्यात वाढ झाली असून तुरी आणि ज्वारीच्या पेरणीकडे सुध्दा शेतकरी वळले असल्याचे सातपुते म्हणाले.

Web Title: 82% sowing in the subdivision subdivision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.