शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
4
आता पोटाच्या प्रश्नांकडे वळा!
5
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
6
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
7
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
8
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
9
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
10
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
11
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
12
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
13
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
14
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
15
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
16
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
17
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
18
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
19
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार

पुसदमध्ये परराज्यातील ६६ कुटुंब अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 05:00 IST

कोरोनामुळे देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. त्यामुळे जिल्हा व राज्यबंदी लागू झाली. तालुक्यांच्या सीमाही सील करण्यात आल्या. यामुळे शहरात अडकून पडलेल्या सर्वांची आरोग्य तपासणी करुन त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था तालुका प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. कोव्हीड-१९ विषाणूने संपूर्ण जगात थैमान घातले. यामुळे २५ मार्चपासून देशात लॉकडाऊन आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊनचा परिणाम : बिहार, जबलपूरच्या नागरिकांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : कोरोनामुळे देशात लॉकडाऊन असल्याने बाहेरील तब्बल ६६ कुटुंबे शहरात अडकू न पडले आहे. यामध्ये महिला, लहान मुले, पुरुष आदी १९७ जणांचा समावेश आहे. तामिळनाडू येथील तब्बल ६०३ विद्यार्थीसुद्धा अडकून पडले आहे.कोरोनामुळे देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. त्यामुळे जिल्हा व राज्यबंदी लागू झाली. तालुक्यांच्या सीमाही सील करण्यात आल्या. यामुळे शहरात अडकून पडलेल्या सर्वांची आरोग्य तपासणी करुन त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था तालुका प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. कोव्हीड-१९ विषाणूने संपूर्ण जगात थैमान घातले. यामुळे २५ मार्चपासून देशात लॉकडाऊन आहे. परिणामी रोजगाराच्या शोधात भटकंती करणारे जबलपूर येथील ४८ सदस्य असलेले १५ कुटुंबे, बिहार राज्यातील ३३ सदस्य असलेले सात कुटुंबे, अकोला जिल्ह्यातील ४० सदस्य असलेले १४ कुटुंबे आणि दारव्हा येथील २१ सदस्य असलेले पाच कुटुंबे, असे एकूण ४१ कुटुंबातील १४७ नागरिक शहरात अडकून पडले आहे. या सर्वांची तीन वैद्यकीय पथकांव्दारे आरोग्य तपासणी करुन त्यांची प्रशासनाने ठरवून दिलेल्या जागी निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.याशिवाय तामिळनाडू राज्यातील ६०३ विद्यार्थी लॉकडाऊनमुळे येथे अडकून पडले. प्रशासनातर्फे त्यांची विविध वसतिगृहांमध्ये राहण्याची व भोजनाची सोय करण्यात आली आहे. या सर्वांची वैद्यकीय तपासणी केली असून त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नसल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आशिष पवार यांनी दिली. शहरात अडकलेल्या सर्वांची निवास व भोजनाची व्यवस्था केली असून लोकप्रतिनिधी व स्वयंसेवी संस्थाच्या मदतीने सदरची व्यवस्था सुरु असल्याची माहिती तहसीलदार प्रा. वैशाख वाहूरवाघ यांनी दिली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस