पुसदमध्ये परराज्यातील ६६ कुटुंब अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 05:00 IST2020-04-13T05:00:00+5:302020-04-13T05:00:29+5:30

कोरोनामुळे देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. त्यामुळे जिल्हा व राज्यबंदी लागू झाली. तालुक्यांच्या सीमाही सील करण्यात आल्या. यामुळे शहरात अडकून पडलेल्या सर्वांची आरोग्य तपासणी करुन त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था तालुका प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. कोव्हीड-१९ विषाणूने संपूर्ण जगात थैमान घातले. यामुळे २५ मार्चपासून देशात लॉकडाऊन आहे.

66 families of other state in Pusad | पुसदमध्ये परराज्यातील ६६ कुटुंब अडकले

पुसदमध्ये परराज्यातील ६६ कुटुंब अडकले

ठळक मुद्देलॉकडाऊनचा परिणाम : बिहार, जबलपूरच्या नागरिकांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : कोरोनामुळे देशात लॉकडाऊन असल्याने बाहेरील तब्बल ६६ कुटुंबे शहरात अडकू न पडले आहे. यामध्ये महिला, लहान मुले, पुरुष आदी १९७ जणांचा समावेश आहे. तामिळनाडू येथील तब्बल ६०३ विद्यार्थीसुद्धा अडकून पडले आहे.
कोरोनामुळे देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. त्यामुळे जिल्हा व राज्यबंदी लागू झाली. तालुक्यांच्या सीमाही सील करण्यात आल्या. यामुळे शहरात अडकून पडलेल्या सर्वांची आरोग्य तपासणी करुन त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था तालुका प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. कोव्हीड-१९ विषाणूने संपूर्ण जगात थैमान घातले. यामुळे २५ मार्चपासून देशात लॉकडाऊन आहे. परिणामी रोजगाराच्या शोधात भटकंती करणारे जबलपूर येथील ४८ सदस्य असलेले १५ कुटुंबे, बिहार राज्यातील ३३ सदस्य असलेले सात कुटुंबे, अकोला जिल्ह्यातील ४० सदस्य असलेले १४ कुटुंबे आणि दारव्हा येथील २१ सदस्य असलेले पाच कुटुंबे, असे एकूण ४१ कुटुंबातील १४७ नागरिक शहरात अडकून पडले आहे. या सर्वांची तीन वैद्यकीय पथकांव्दारे आरोग्य तपासणी करुन त्यांची प्रशासनाने ठरवून दिलेल्या जागी निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
याशिवाय तामिळनाडू राज्यातील ६०३ विद्यार्थी लॉकडाऊनमुळे येथे अडकून पडले. प्रशासनातर्फे त्यांची विविध वसतिगृहांमध्ये राहण्याची व भोजनाची सोय करण्यात आली आहे. या सर्वांची वैद्यकीय तपासणी केली असून त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नसल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आशिष पवार यांनी दिली. शहरात अडकलेल्या सर्वांची निवास व भोजनाची व्यवस्था केली असून लोकप्रतिनिधी व स्वयंसेवी संस्थाच्या मदतीने सदरची व्यवस्था सुरु असल्याची माहिती तहसीलदार प्रा. वैशाख वाहूरवाघ यांनी दिली.

Web Title: 66 families of other state in Pusad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.