शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

माणुसकी झाली कलंकित; ५७ वर्षीय नराधमाचा गतिमंद मुलीवर अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2023 10:41 IST

अशीच संतापजनक घटना ढाणकी शहराजवळ घडली असून येथे चिमुकलीचा चुलत काकाने विनयभंग केला.

यवतमाळ : सैतान अंगात शिरल्यानंतर माणुसकी उरतेच कुठे? वडकी परिसरात अशाच एका ५७ वर्षीय नराधमाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. त्याला परिसरातील शेतकऱ्यांसह महिलांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. अशीच संतापजनक घटना ढाणकी शहराजवळ घडली असून येथे चिमुकलीचा चुलत काकाने विनयभंग केला. या प्रकरणी आरोपी काकाला आदिलाबाद येथून अटक करण्यात आली आहे.

गतिमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे नाव बंडू श्यामराव महाजन (५७) असे असल्याचे पोलिसांनी सांगितले. या नराधमाने परिसरातीलच एका गावातील एका अल्पवयीन गतिमंद मुलीला बळजबरीने मोटरसायकलवर बसविले. तेथून ५०० मीटर अंतरावर असलेल्या बेंबळा प्रकल्पाच्या मुख्य कालव्यावर मोटरसायकल थांबवून तो तिला बेंबळा कॅनॉलच्या बाजूला घेऊन गेला. तेथे शेतातील निर्जनस्थळी निंबाच्या झाडाखाली त्याने अत्याचाराचा प्रयत्न केला. ही घटना एका मुलीने पाहिली, तिने तत्काळ घटनेची माहिती कपाशीची लागवड करीत असलेल्या मजुरांना दिली. शेतकऱ्यासह मजूर तत्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी नराधमास पकडून पोलिसांना पाचारण केले. वडकी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपीला ताब्यात घेतले.

पीडितेच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीची चौकशी केल्यानंतर तपास अधिकारी रामेश्वर वैजने यांनी कलम ३७६ (२) आय, ३७६ (जे), ३७६ (एल) भादंवि सहकलम ४, ६, पोक्सो कायदा २०१२ सहकलम ३ (२) (व्ही) अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली. या प्रकरणात आणखी कोणी आरोपी आहे का, याचाही तपास करण्याची गरज नागरिकांतून व्यक्त होत आहे.

चॉकलेटचे आमिष दाखवून बळजबरीचा प्रयत्न

ढाणकीपासून जवळच असलेल्या एका गावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना सोमवारी सायंकाळी ५:३० च्या सुमारास घडली. चिमुकली मुलगी घराजवळ खेळत असताना २२ वर्षीय चुलत काकाने तिला चॉकलेटचे आमिष दाखविले आणि जवळच्या शेतात नेले. चिमुकलीला शेतात नेताना एकाने पाहिले, हा मुलीला कुठे घेऊन जात आहे, हे पाहण्यासाठी तो त्याच्या मागे गेला असता नराधम चिमुकलीसोबत बळजबरी करण्याचा प्रयत्न करीत होता. पाठीमागून आलेल्या व्यक्तीला पाहताच आरोपीने पळ काढला. या प्रकरणी मुलीच्या आई-वडिलांनी बिटरगाव पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. सदर आरोपी काकाला आदिलाबाद येथून अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध विनयभंगासह पोक्सोअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळMolestationविनयभंग